जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smartphone वापरताना तुम्ही या चुका करत असाल तर सावधान! फोन खराब होण्याचा धोका

Smartphone वापरताना तुम्ही या चुका करत असाल तर सावधान! फोन खराब होण्याचा धोका

Smartphone वापरताना तुम्ही या चुका करत असाल तर सावधान! फोन खराब होण्याचा धोका

आपल्या स्मार्टफोनची काळजी सर्वच जण घेतात, पण तरीही काही अशा गोष्टी चुका होतात, ज्याचा परिणाम स्मार्टफोनवर होतो. त्यामुळेच स्मार्टफोन खराब होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : स्मार्टफोन (Smartphone) सर्वांच्याच आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बनला आहे. अधिकतर कामं आजकाल मोबाईलवर एका क्लिकवर केली जातात. गेम खेळण्यापासून ते अगदी ऑनलाईन बँकिंग, पेमेंट, शॉपिंग अनेक गोष्टी यावर केल्या जातात. आपल्या स्मार्टफोनची काळजी सर्वच जण घेतात, पण तरीही काही अशा गोष्टी चुका होतात, ज्याचा परिणाम स्मार्टफोनवर होतो. त्यामुळेच स्मार्टफोन खराब होऊ शकतो. काम झाल्यावर फीचर्स बंद न करणं - मोबाईलमध्ये वाय-फाय (WiFi), जीपीएस (GPS), ब्लूटूथसारखे (Bluetooth) कनेक्टिव्हिटी फीचर्स काम संपल्यानंतर बंद करणं आवश्यक आहे. हे फीचर्स सुरुच ठेवल्यास यामुळे बॅटरी (Phone Battery) अधिक संपते. हे फीचर्स बंद ठेवल्याने फोनच्या प्रोसेसरचा स्पीडही वाढतो. व्हायब्रेशन मोड - व्हायब्रेशन मोडचा वापर ज्यावेळी गरज असेल, त्याचवेळी करावा. अनेक जणांना फोन सतत व्हायब्रेशन मोडवर ठेवण्याची गरज असते. यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. बॅटरी लाईफही कमी होतं.

या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, हॅकर्स कधीच चोरी करू शकणार नाही तुमचा डेटा

स्क्रिन ऑन टाईम - स्क्रिन ऑन टाईम जितक्या जास्त असेल, तितकी बॅटरी संपेल. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी ब्राईटनेस कमी ठेवणं महत्त्वाचं ठरतं. ऑटो-ब्राईटनेस मोडचा वापर करावा. हा मोड फोनच्या ब्राईटनेसला बाहेरील उजेडासोबत अॅडजस्ट करतो. यामुळेही बॅटरी कमी संपते. गरजेहून अधिक चार्जिंग - मोबाईल गरज असेल, तेव्हाच चार्ज करा. 50-60 टक्के बॅटरी असताना फोन चार्ज करू नका. असं केल्याने बॅटरीवर दबाव पडतो आणि बॅटरी खराब किंवा ब्लास्ट होण्याची शक्यता वाढते. बॅटरी 20 टक्के किंवा त्याहून कमी असेल, त्याचवेळी फोन चार्ज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात