• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • एका दिवसात तब्बल 600 कोटी रुपयांच्या Ola Electric Scooter ची विक्री, प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर्स Sell

एका दिवसात तब्बल 600 कोटी रुपयांच्या Ola Electric Scooter ची विक्री, प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर्स Sell

Ola Electric ने विक्रीच्या पहिल्याच दिवशी Ola S1 च्या 600 कोटी रुपयांहून अधिक स्कूटरची विक्री केली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : Ola Electric Scooter ला ग्राहकांचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. Ola चे फाउंडर आणि CEO भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी Ola Electric ने विक्रीच्या पहिल्याच दिवशी Ola S1 च्या 600 कोटी रुपयांहून अधिक स्कूटरची विक्री केली असल्याचं सांगितलं. भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अग्रवाल यांनी ट्विटमध्ये सांगितलं, की 'भारत Electric Vehicle साठी प्रतिबद्ध आहे. आम्ही अधिकतर चार स्कूटर प्रति सेकंद विक्री केली आहे आणि एका दिवसांत 600 कोटीहून अधिकची विक्री झाली आहे' अग्रवाल यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितलं, की खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ग्राहकांनी Ola Scooter चं मोठ्या संख्येने बुकिंग केलं. ग्राहकांनी दिलेली ही प्रतिक्रिया आमच्या अपेक्षेहून अधिक आहे. Ola Electric Scooter ऑनलाईन खरेदी करण्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर जावं लागेल. कंपनीने आपली ई-स्कूटर दोन वेरिएंटमध्ये लाँच केली आहे. ज्यात एक Ola S1 आणि दुसरं Ola S1 Pro आहे. Ola ई-स्कूटरचं S1 वेरिएंट बेसिक असून याची किंमत 99,999 रुपये आहे. तर S1 Pro कंपनीचं टॉप मॉडेल वेरिएंट असून याची किंमत 1,29,999 रुपये आहे. त्याशिवाय जर EMI वर स्कूटर खरेदी करायची असल्यास, कंपनीने त्यासाठीही पर्याय दिला आहे. जर तुम्ही OLA e-scooter खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी असून एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं लागेल, की यावर 20000 रुपयांपर्यंत सबसिडीचा फायदा घेता येऊ शकतो. हा फायदा FAME-2 स्कीम आणि स्टेट सबसिडी अंतर्गत घेता येऊ शकतो.

  Ola Electric Scooter चे भन्नाट फीचर्स; कंपनीने शेअर केलेला हा VIDEO पाहाच

  केंद्र सरकारशिवाय देशातील चार राज्य इलेक्ट्रिक वाहनावर आणखी वेगळी सबसिडी देत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान राज्यातील लोकांना सबसिडीचा फायदा मिळू शकतो. दिल्ली - Ola S1 - 85,099 Ola S1 Pro - 1,10,149 महाराष्ट्र - Ola S1 - 94,999 Ola S1 Pro - 1,24,999 गुजरात - Ola S1 - 79,999 Ola S1 Pro - 1,09,999 राजस्थान - Ola S1 - 89,968 Ola S1 Pro - 1,29,999
  Published by:Karishma
  First published: