Apple विरोधात ठोकला 10 लाखांचा दावा, कारण वाचून तुम्हीही iPhone घेताना कराल हजारदा विचार

एका iPhone युझकनं अॅपल कंपनी विरोधातच 10 लाखांचा दावा ठोकला आहे. हा दावा का ठोकला, याचे कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 05:29 PM IST

Apple विरोधात ठोकला 10 लाखांचा दावा, कारण वाचून तुम्हीही iPhone घेताना कराल हजारदा विचार

रूस, 04 ऑक्टोबर : अॅपलचा कोणताही फोन असला तरी, लाखो लोक तो विकत घेण्यासाठी उत्सुक असतात. मग iPhoneची किंमत लाखांमध्ये असली तरीही फोन विकत घेतले जातात. मात्र रशियातील रूस येथे एक आगळीवेगळी घटना घडली आहे. येथील एका iPhone युझकनं अॅपल कंपनी विरोधातच 10 लाखांचा दावा ठोकला आहे. हा दावा का ठोकला, याचे कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

रूसमधील एका आयफोन युझरनं अब्रू-नुकसानीचा दावा ठोकला आहे. मेट्रो युकेनं दिलेल्या बातमीनुसार, आयफोन वापरणाऱ्या रूसमधील व्यक्तीनं अॅपल कंपनी विरोधात अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे. त्याच्या मते अॅपल फोनमुळे तो गे (समलैंगिक) बनला आहे. या व्यक्तीनं या आरोपविरोधात अॅपलवर 1 मिलियन रूबल (10.8 लाख) रुपयांचा दावा ठोकला आहे.

मेट्रो युकेनं दिलेल्या बातमीनुसार, अॅपलवर आरोप केलेल्या व्यक्तीनं आपल्या iPhoneमध्ये एक अॅप डाऊनलोड केले होते. त्या अॅपमुळं त्यानं बिटकॉईनची खरेदीही केली होती. मात्र बिटकॉईन ऐवजी 69 गेकॉईन (परदेशातीली व्यवहार करण्याचे इंटरनेटवरील माध्यम आहे). यावेळी त्याला अॅपसोबत, “यात वापरून पाहा, आधीच मत बनवू नका”, असा मेसेज आला होता.

वाचा-iPhoneचा नाद करायचा नाय! एक वर्षापूर्वी नदीत पडलेल्या फोनचं पाहा काय झालं

तर, या युझरनं मास्को टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, “मी विचार केला की हे अॅप न वापरता मी कसं मत बनवू? त्यानंतर मी समलैंगिक नातं स्वीकारण्याचा विचार केला. माझा आता एक बॉयफ्रेण्ड आहे”, असे मत व्यक्त केले.

Loading...

वाचा-अतीशहाणपणा नडला! सिंहाच्या पिंजऱ्यात घुसली महिला, पाहा हा VIRAL VIDEO

दरम्यान आता या तरूणाला प्रश्न पडला आहे की आपल्या आई-वडिलांना आपल्या या नात्याबाबत कसे सांगायचे. या मुलाखतीत त्यानं, “मला कळत नाही की मी घरच्यांना कसे सांगू. माझं आयुष्य पूर्णत: बदलून गेले आहे. कदाचित आता मी पुन्हा कधीच नॉर्मल होऊ शकत नाही”, असे सांगितले. तर, मेल ऑनलाईन या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीत, अॅपलनं या युझरला धोका देऊन त्याला समलैंगिकता करायला भाग पाडले आहे, असा आरोप संबंधितांकडून करण्यात आला आहे. यामुळं युझरला नैतिक आणि मानसिक त्रासही झाला आहे. तर आरोप करणाऱ्या वकिलांनी, हे अॅप जरी थर्ड पार्टीचे असले तरी, त्यासाठी अॅपल जबाबदार आहे”, असे मत व्यक्त केले. अॅपलवर झालेल्या या आरोपानंतर iPhone विकत घ्यायचा का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

वाचा-8.5 फूटाचा मासा, किंमत 23 कोटी! पाहा काय केलं ‘एका कोळियानं’

VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: apple
First Published: Oct 4, 2019 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...