अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील ब्रॉन्स प्राणी संग्हालयात एक मोठा हादसा होता होता वाचला. एका महिलेचा अतिशहाणपणा तेथील कर्मचाऱ्यांना भोवला असता. एक महिलेने मस्करीत थेट सिंहाच्या पिंजऱ्यातच उडी घेतली. एवढंच नाही तर जेव्हा सिंह समोर आला तेव्हा ती त्याला चिडवू लागली. सोशल मीडियावर त्या महिलेचा आगाऊपणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर मुलीला अनेक गोष्टी सुनावल्या जात आहेत. जंगलाचा राजा असलेला सिंह किती हिंसक प्राणी आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. सर्व गोष्टी माहीत असतानाही ती थेट सिंहाच्या पिंजऱ्यात घुसली. हा व्हिडीओ प्राणीसंग्रहालयात फिरायला आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने शूट केला. रिअल सोबरीना या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, ‘शेवटपर्यंत हा व्हिडीओ पाहा. नंतर जे झालं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’ सिंहाच्या पिंजऱ्यात महिला घुसताच सिंह तिच्या समोर आला. सिंहाला पाहून मुलगी त्याचं लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी हातवारे करू लागली आणि त्याला चिडवून दाखवू लागली. सिंह तिला फक्त पाहत राहिला. त्याने महिलेला कोणतीच इजा केली नाही.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मुलीला अक्कल नसल्याचं म्हटलं जात आहे. एका युझरने लिहिले की, ‘हा एक निव्वळ मुर्खपणा होता. जर सिंहाने हल्ला केला असता तर प्राणी संग्रहालयातील लोकांनी सिंहालाच शिक्षा केली असती. त्यांनी हे पाहिलं नसतं की ती मुलगी जाणीवपूर्वक त्याच्या पिंजऱ्यात शिरली आहे.’ दरम्यान ब्रॉन्स प्राणीसंग्रहालयाने स्टेटमेन्ट जारी करत म्हटलं की, त्या मुलीने नियमांचं उल्लंघन केलं आहे. तिच्या या कृतीमुळे तिचे प्राणही गेले असते. काँग्रेस नेत्यांमधील वाद कॅमेऱ्यात कैद; उमेदवारीवरून नाराजीचा VIDEO VIRAL