iPhoneचा नाद करायचा नाय! एक वर्षापूर्वी नदीत पडलेल्या फोनचं पाहा काय झालं

तब्बल एका वर्षांपूर्वी हरवलेला आयफोन सापडला नदीत, पुढे काय झालं वाचून व्हाल थक्क.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2019 05:44 PM IST

iPhoneचा नाद करायचा नाय! एक वर्षापूर्वी नदीत पडलेल्या फोनचं पाहा काय झालं

कॅलिफोर्निया, 02 ऑक्टोबर : जर तुमचा फोन पाण्यात पडला तर काय होत? काही मिनीटांमध्ये तुम्हाला हजारोंचा फटका बसतो, आणि दु:ख होतं ते वेगळं. आणि त्यात जर हा फोन iPhone असेल तर विचारायलाच नको. मात्र एक युट्यूबरनं (YouTuber) चक्क नदीत पडलेला आयफोन शोधून काढला. कमालीची गोष्ट म्हणजे, या फोनला काहीच झालं नव्हतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा फोन तब्बल 1 वर्षांआधी पाण्यात पडला होता.

अमेरिकेचा युट्युबर मायकल बेनेट (Michael Bennet) नगेटनॉगिंग (Nuggetnoggin) नावाचा चॅनल चालवतो. स्कुबा डायव्हर असलेल्या मायकलनं याआधीही अशी कामगिरी केली आहे. मायकलनं अनेक वेळा पाण्यातून असंख्य किमती गोष्टी शोधल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच मायकलच्या या अडव्हेंचरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. कॅलिफोर्नियाच्या अडिस्टो नदीत डीप डायव्हिंग करत असताना मेटल डिडिक्टरच्या मदतीनं त्यानं आयफोन शोधला. या सगळ्या अडव्हेंचरचा व्हिडीओ मायकलनं युट्युबवर टाकला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

मायकलनं याबाबत डब्लूडीएएम7 या लोकाल न्यूज चॅनलला याबाबत सांगताना, “फोन शोधणे कठिण नव्हते, मात्र त्याच्या मालकाचा शोध घेणे कठिण होते. कारण फोनला पासवर्ड होता. मात्र आम्ही या फोनचे सिम कार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकले, आणि मालकाला शोधले”, असे सांगितले.

या फोनचा मालक एरिका बेनेट यांचा फोन 19 जून 2018मध्ये कुटुंबासोबत फिरायला गेले असता नदीत पडला होता.

Loading...

टिप- या आयफोनला एक कव्हर असल्यामुळं, पाण्यात पडूनही फोनला काही झाले नाही.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: youtube
First Published: Oct 2, 2019 01:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...