मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवीन वर्षात Royal Enfield च्या 'या' चार नवीन गाड्या लाँच होणार; जाणून घ्या काय असतील फीचर्स

नवीन वर्षात Royal Enfield च्या 'या' चार नवीन गाड्या लाँच होणार; जाणून घ्या काय असतील फीचर्स

बुलेट नावाने या कंपनीच्या अनेक गाड्या प्रसिद्ध असून कंपनी पुढील वर्षी नवीन गाड्या लाँच करणार आहे. 2021 मध्ये रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) चार नवीन गाड्या (New Model Launcing) लाँच करणार आहे.

बुलेट नावाने या कंपनीच्या अनेक गाड्या प्रसिद्ध असून कंपनी पुढील वर्षी नवीन गाड्या लाँच करणार आहे. 2021 मध्ये रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) चार नवीन गाड्या (New Model Launcing) लाँच करणार आहे.

बुलेट नावाने या कंपनीच्या अनेक गाड्या प्रसिद्ध असून कंपनी पुढील वर्षी नवीन गाड्या लाँच करणार आहे. 2021 मध्ये रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) चार नवीन गाड्या (New Model Launcing) लाँच करणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : देशभरात तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेल्या रॉयल एन्फिल्डच्या (Royal Enfield) विविध गाडयांना मोठी मागणी आहे. बुलेट नावाने या कंपनीच्या अनेक गाड्या प्रसिद्ध असून कंपनी पुढील वर्षी नवीन गाड्या लाँच करणार आहे. 2021 मध्ये रॉयल एन्फिल्ड (Royal Enfield) चार नवीन गाड्या (New Model Launcing) लाँच करणार असून जागतिक बाजारपेठेत आणखी पसरण्यासाठी या गाड्या कंपनीला खूप फायदेशीर ठरणार आहेत. या गाड्या कंपनी दर तिमाहीला लाँच करणार आहे.

NEW-GEN रॉयल एनफील्ड क्लासिक 350 -

सध्या बाजारात ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु आगामी वर्षात या गाडीचं नवीन व्हर्जन लाँच करणार असून यात 349cc चे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात येणार आहे. वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ही गाडी लाँच केली जाणार असून यात straight-line stability मिळणार असून यामुळे चालकांना विना अडथळा गाडी चालवण्यास मदत मिळणार आहे. कंपनीने ही गाडी‘J’ architecture या फ्लॅटफॉर्मच्या धर्तीवर तयार केली आहे. या गाडीच्या डिझाईनमध्ये काही बदल केले जाणार की याच गाडीला मॉडिफाय केलं जाणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.

ROYAL ENFIELD INTERCEPTOR 350 -

ही गाडी देखील 349cc असून जुन्या गाडीच्या तुलनेत यात थोडेफार बदल करण्यात येणार आहे. चेन्नईमध्ये या गाडीचं टेस्टिंग सुरु असून या गाडीच्या इंजिनमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. यात ट्विन एग्जॉस्ट सिस्टम नसून सिंगल साइड-माउंटेड एग्जॉस्ट यूनिट देण्यात येणार आहे. या गाडीच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले असून Meteor 350 ची देखील झलक या गाडीत पाहायला मिळणार आहे.

(वाचा - हॅकर्सकडे आहे तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड? वाचा कसं तपासाल)

ROYAL ENFIELD 650 CRUISER -

या गाडीची भारतीय चाहत्यांना मागील काही काळापासून प्रतीक्षा आहे. 2019 मध्ये इटलीतील EICMA Motor Show मध्ये प्रदर्शित केली होती. या गाडीत सर्क्युलर हेड लॅम्प, सिलिंडर आकाराचा फ्युल टॅंक आणि फिनिश्ड अलॉय व्हील्स मिळणार आहेत. त्याशिवाय याचं इंजिन 650cc चं असणार असून RE 650 twins च्या धर्तीवर याचं डिझाईन केलं आहे. त्यामुळे ही गाडी पुढील वर्षी जूनमध्ये लाँच झाल्यानंतर याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(वाचा - FASTag Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज)

UPDATED ROYAL ENFIELD HIMALAYAN -

रॉयल एन्फिल्डच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या गाड्यांमध्ये हिमालयन या गाडीचा समावेश आहे. तरुणांमध्ये ही गाडी सर्वात लोकप्रिय असून 2021 मध्ये या गाडीचं नवीन व्हर्जन येणार आहे. या गाडीमध्ये विविध फीचर्स मिळणार असून यात ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टीम (Navigation System) आणि यूएसबी चार्जिंगची (USB Charging) सुविधा मिळणार आहे. त्यामुळे लॉन्ग ड्राइव्हमध्ये याची मोठी मदत होणार आहे. या गाडीत 411cc चं सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येणार आहे. ही गाडी बर्फाळ प्रदेशामध्ये तसंच डोंगराळ प्रदेशात देखील अतिशय उत्तम चालते. यामुळे लॉन्ग ड्राइव्हसाठी ही गाडी खूपच फायदेशीर आहे.

First published:

Tags: Royal enfield 350