Home /News /technology /

VIDEO: Bullet चालवणाऱ्यांनो सावधान! अचानक आग लागल्याने बॉम्बप्रमाणे फुटली नवी Royal Enfield

VIDEO: Bullet चालवणाऱ्यांनो सावधान! अचानक आग लागल्याने बॉम्बप्रमाणे फुटली नवी Royal Enfield

नव्या कोऱ्या रॉयल एनफील्डमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. बुलेटमध्ये अचानक आग लागल्यानंतर एखाद्या बॉम्बप्रमाणे भयंकर स्फोट झाला.

  नवी दिल्ली, 4 एप्रिल : मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये (Electric Scooter) आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. आता इलेक्ट्रिक स्कूटरनंतर रॉयल एनफील्डचं (Royal Enfield) एक प्रकरण समोर आलं आहे. नव्या कोऱ्या रॉयल एनफील्डमध्ये आग लागल्याची ही घटना आहे. बुलेटमध्ये अचानक आग लागल्यानंतर एखाद्या बॉम्बप्रमाणे भयंकर स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर बुलेटमधून धूराचे लोट निघू (Royal Enfield Fire) लागला. हे संपूर्ण प्रकरण कर्नाटकातील मैसूर येथील आहे. रविचंद्रा नावाच्या व्यक्तीने नवी कोरी बुलेट घेतली होती. बुलेट घेतल्यानंतर ती आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील प्रसिद्ध कासापुरम आंजनेय स्वामी मंदिरात आणली होती. त्याचवेळी बुलेटमध्ये अचानक आग लागली. बुलेटमध्ये आग लागल्याने मंदिराबाहेर एकच खळबळ उडाली. काही वेळात आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की बुलेट काही वेळात एखाद्या बॉम्बप्रमाणे फुटली. याचा आवाजही बॉम्ब फुटल्याप्रमाणे होता त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर परसला होता.

  हे वाचा - Electric Scooter मध्ये आग लागल्यानंतर एक्सपर्टचा मोठा इशारा, काय होतं आगीचं कारण

  ही बुलेट पार्किंगमध्ये उभी होती. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बुलेटने पेट घेतला. बुलेटजवळ इतरही काही गाड्या उभ्या होत्या. या बुलेटला आग लागल्याने इतर गाड्यांमध्येही आग लागली. त्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांच्या मदतीने आग विझवली. बुलेटमध्ये आग लागल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याआधी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग (Electric Scooter Fire) लागल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. पुण्यात ओलाच्या ई-स्कूटरमध्ये आग लागली (Ola E-Scooter Fire) होती. त्यानंतर वेल्लोरमध्येही एकच एक प्रकरण समोर आलं होतं, ज्यात ओकिनावा ई-स्कूटरमध्ये आग (Okinawa E-Scooter Fire) लागली होती. त्याशिवाय प्योर ईवीच्या ई-स्कूटरमध्ये (Pure EV E-Scooter) आग लागली होती.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Bullet, Fire, Shocking video viral

  पुढील बातम्या