जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Electric Scooter मध्ये आग लागल्यानंतर एक्सपर्टचा मोठा इशारा, काय होतं आगीचं कारण

Electric Scooter मध्ये आग लागल्यानंतर एक्सपर्टचा मोठा इशारा, काय होतं आगीचं कारण

Electric Scooter मध्ये आग लागल्यानंतर एक्सपर्टचा मोठा इशारा, काय होतं आगीचं कारण

ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या (Ola Electric Scooter Fire) घटनेनंतर ओटोमोबाइल कंपन्या सुरक्षेबाबत किती सतर्क आहे असा प्रश्न पुढे येतो आहे. याबाबत एक्सपर्टकडून इशारा देण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 मार्च : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीदरम्यान अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicles) वळत असल्याचं चित्र आहे. विविध कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच (Electric Scooter) करत आहेत. परंतु आता इलेक्ट्रिक स्कूटर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेफ्टीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या (Ola Electric Scooter Fire) घटनेनंतर ओटोमोबाइल कंपन्या सुरक्षेबाबत किती सतर्क आहे असा प्रश्न पुढे येतो आहे. याबाबत एक्सपर्टकडून इशारा देण्यात आला आहे. ओला स्कूटरला आग लागल्याच्या घटनेनंतर ऑटो तज्ज्ञ मुराद अली बेग यांनी इशारा देत सांगितलं, की यासाठी सरकारने कोणतेही सुरक्षा मानक ठरवलेले नाहीत. याचा फायदा घेत नव्या कंपन्या चीनमधून बॅटरी, मोटार आणि इतर भाग आयात करत आहेत आणि भारतात ई-स्कूटर असेंबर करुन विक्री होत आहे. ई-स्कूटर तयार करणाऱ्या कंपन्यांकडे सुरक्षा मानकं तपासण्यासाठी कोणतेही मानत नाहीत. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. आगामी काळात याचे आणखी गंभीर परिणामही दिसू शकतात. मुराद अली बेग यांनी एका खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. Ola S1 Pro स्कूटरमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. 31 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये Ola S1 Pro Electric Scooter एका रस्त्यालगत उभी असल्याचं दिसत असून त्यातून आग आणि धूराचे लोट येत असल्याचं दिसतं आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यात घडली असून आग का लागली याबाबतच्या कारणांचा तपास सुरू आहे. स्कूटरचा चालक पूर्णपणे सुरक्षित असल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. सध्या आगीचं स्पष्ट कारण समोर आलं नसलं, तरी लिथियम-आयन बॅटरीत शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे.

हे वाचा -  Shocking! पुण्याच्या रस्त्यावर उभ्या उभ्या खाक झाली E-Scooter; पेटत्या स्कूटरचा VIDEO VIRAL

लिथियम आयन बॅटरीमध्ये लागलेली आग विझवणं अतिशय कठीण ठरतं. पाण्याच्या संपर्कात आल्यास आग हायड्रोजन गॅस आणि लिथियम-हायड्रॉक्साइड निर्माण करतं. हायड्रोजन गॅसमुळे आग लागते. आता कारण कोणतंही असलं, तरी अशा आधुनिक इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागणं भयंकर घटना आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात