मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या गाडीला अपघात झाल्यास नियमानुसार हे असतात अधिकार; जाणून घ्या अशावेळी काय कराल

तुमच्या वाहनामुळे दुसऱ्या गाडीला अपघात झाल्यास नियमानुसार हे असतात अधिकार; जाणून घ्या अशावेळी काय कराल

रस्त्यावरून जात असताना तुमच्यामुळे दुसऱ्या वाहनाचं नुकसान झाल्यास, त्या वाहनावर ओरखडे उठतात, कोणी तरी जखमी होतं. अशी वेळ कोणावरही येऊ शकते आणि साहजिकच ती अचानक येते. अशा स्थितीत नेमकं करायचं काय? नियमानुसार तुमच्याकडे कोणते अधिकार असतात?

रस्त्यावरून जात असताना तुमच्यामुळे दुसऱ्या वाहनाचं नुकसान झाल्यास, त्या वाहनावर ओरखडे उठतात, कोणी तरी जखमी होतं. अशी वेळ कोणावरही येऊ शकते आणि साहजिकच ती अचानक येते. अशा स्थितीत नेमकं करायचं काय? नियमानुसार तुमच्याकडे कोणते अधिकार असतात?

रस्त्यावरून जात असताना तुमच्यामुळे दुसऱ्या वाहनाचं नुकसान झाल्यास, त्या वाहनावर ओरखडे उठतात, कोणी तरी जखमी होतं. अशी वेळ कोणावरही येऊ शकते आणि साहजिकच ती अचानक येते. अशा स्थितीत नेमकं करायचं काय? नियमानुसार तुमच्याकडे कोणते अधिकार असतात?

पुढे वाचा ...

मुंबई ,16 फेब्रुवारी : बऱ्याच वेळा असं होतं, की तुम्ही तुमचं किंवा दुसऱ्या कोणाचं तरी वाहन घेऊन रस्त्यावरून जात असता आणि दुर्दैवाने दुसऱ्या वाहनाशी टक्कर होते. त्यामुळे दुसऱ्या वाहनाचं नुकसान (Accident) होतं, त्या वाहनावर ओरखडे उठतात, कोणी तरी जखमी होतं. अशी वेळ कोणावरही येऊ शकते आणि साहजिकच ती अचानक येते. अशा स्थितीत नेमकं करायचं काय? नियमानुसार तुमच्याकडे कोणते अधिकार असतात?

अशा केसमध्ये बऱ्याच वेळा दुसऱ्या वाहनाचा मालक नुकसानभरपाई म्हणून पैशांची मागणी करतो. त्या वेळी हे नक्की लक्षात ठेवा, की त्या वाहनाच्या मालकाला अपघातस्थळी पैसे देण्याची आवश्यकता नाही. अशी स्थिती ओढवल्यास अजिबात घाबरू नका. तुमच्या वाहनाचा विमा उतरवलेला असेल, तर तुम्हाला घटनास्थळी कोणताही तोडगा काढण्याची गरज नाही. काही ठरलेल्या प्रक्रियांचं पालन करायला हवं किंवा दुसऱ्या पार्टीला पोलिसांकडे येण्यास सांगायला हवं. अशा स्थितीत त्या नुकसानभरपाईचा भार तुमच्यावर येत नाही. वाहनाचा विमा उतरवलेला असल्यास, आपल्या वाहनामुळे दुसऱ्या वाहनाचं झालेलं नुकसान भरून देण्याची जबाबदारी (Liability) विमा कंपनीची (Insurance Company) असते.

अर्थात, विमा कंपन्यांच्या यासाठी काही अटीही असतात. अपघाताच्या वेळी जो ड्रायव्हर वाहन चालवत असेल, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसेन्स आणि वाहनाशी संबंधित अन्य कागदपत्रं असणं बंधनकारक आहे. त्या ड्रायव्हरचं लायसेन्स (Driving License) जप्त झालेलं असता कामा नये.

(वाचा - आज मध्यरात्रीपासून FASTag बंधनकारक; जाणून घ्या कसा रिचार्ज कराल)

तुमच्याकडे लर्निंग लायसेन्स असलं, तर तेसुद्धा तुमच्याबरोबरच हवं. केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 नुसार वैध लर्निंग लायसेन्स असेल, तर तुम्हाला ड्रायव्हिंगचा अधिकार असतो.

घटनास्थळी कोणताही करार करू नये -

तुमच्या कार किंवा बाइकमुळे अपघात झाला असेल, तर तुम्हाला अपघातस्थळी कोणताही करार करता कामा नये. गाडीचा विमा असेल, तर नुकसानभरपाईची जबाबदारी विमा कंपनी उचलते.

हेही लक्षात घ्या, की ज्याच्या वाहनाचं नुकसान झालं आहे, ती व्यक्ती त्या वाहनाच्या नुकसानभरपाईचा दावा त्याच्या इन्शुरन्स कंपनीकडेही करू शकते. असं अनेकदा घडतं, की ज्याच्या वाहनाचं नुकसान होतं, ती व्यक्ती तुमच्याकडून नुकसानभरपाई मागते आणि शिवाय आपल्या इन्शुरन्स कंपनीकडेही दावा करते. त्यामुळे त्या व्यक्तीला दोन्हीकडून पैसे मिळतात. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा, की अपघात झाला तर पोलिसांकडे जाणं आणि आपल्या इन्शुरन्स कंपनीला कळवणं ही सर्वांत योग्य गोष्ट आहे.

पोलिसांना का कळवायचं? 

तुमची कार किंवा बाइकमुळे अपघात झाला असेल, तर सर्वांत आधी पोलिसांना (Police) कळवावं. आपल्या वाहनाच्या कागदपत्रांच्या फोटोकॉपी पोलिसांकडे द्यावी. अशा स्थितीत पोलीस आणि संबंधित यंत्रणांना सहकार्य करावं.

विमा कंपनीची जबाबदारी -

आपल्या विमा कंपनीला (Insurance Company) अपघातासंबंधीची सगळी माहिती द्यावी. पॉलिसी नंबरही द्यावा. अपघातात कोणी जखमी झालं असेल किंवा कोणाचा मृत्यू झाला असेल, तर नुकसानभरपाईची जबाबदारी विमा कंपनीची असते. ती कंपनीच तुमची केस कोर्टात लढवते.

किती नुकसानभरपाई? 

मोटार वाहन कायदा 1988च्या  सेक्शन 2-1 (आय) नुसार, तुमच्या वाहनामुळे झालेल्या अपघातात कोणाचा मृत्यू झाला किंवा कोणी गंभीर जखमी झालं, तर म्हणजेच थर्ड पार्टी कव्हर साडेसात लाख रुपयांपर्यंत मिळू शकतं.

कोर्टात द्या योग्य माहिती-  

तुम्हाला कोर्टाकडून समन्स आले, तर तुम्हाला तिथे हजर होऊन अपघाताबद्दलची योग्य माहिती देणं गरजेचं आहे. अपघात कसा झाला, याचा नकाशाही तुम्ही कोर्टात सादर करू शकता. योग्य माहिती दिलीत, तर खटला लवकर निकाली निघेल.

 

कागदपत्रं हवीत वैध -

तुमच्या गाडीमुळे अपघात झाला असेल आणि विमा कंपनीने तुमचा दावा स्वीकारायला हवा असेल, तर तुमच्याकडे त्या वेळी वाहनाची वैध कागदपत्रं असायला हवीत. तुमचं ड्रायव्हिंग लायसेन्सही वैध असायला हवं. तसं नसेल, तर विमा कंपनी तुमचा दावा स्वीकारणार नाही.

(वाचा - MapmyIndia आणि ISRO ची Google Maps ला टक्कर, लवकरच आणणार नवा मॅप!)

मद्यपान केलं असेल , तर कठीण... 

ड्रायव्हर दारू प्यायला असेल आणि त्या स्थितीत त्याच्याकडून अपघात झाला असेल, त्या अपघातात कोणी जखमी झाला असेल किंवा कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ड्रायव्हर नक्की अडचणीत सापडणार. अपघाताच्या वेळी ड्रायव्हरच्या शरीरात अल्कोहोलचं प्रमाण प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर विमा कंपनी तुमचा दावा स्वीकारणार नाही. कोर्टात तुमची केसही तुम्हालाही लढवावी लागेल.

बेजबाबदारपणा महागात पडेल -

रस्त्यावर वाहन चालवताना शिस्तीने, नियमाने चालवावं. बेजबाबदारपणे चालवू नये. तुम्ही बेपर्वाईने वाहन चालवत असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं, तर तुम्ही अडचणीत सापडाल. नव्या मोटार वाहन कायद्यात अशा गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यातल्या कोणत्याही नियमाचं उल्लंघन तुमच्याकडून झालं असेल तर अडचणी वाढू शकतात.

First published:

Tags: Accident, India, Insurance, Liability, License, Road accident