Explainer: सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनचं धोरण का योग्य नाही? जाणून घ्या जाणकाराचं म्हणणं

Explainer: सध्याच्या स्थितीत लॉकडाऊनचं धोरण का योग्य नाही? जाणून घ्या जाणकाराचं म्हणणं

सध्या महाराष्ट्रात दररोज सुमारे 16,000 रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात किंवा संपूर्ण राज्यातच लॉकडाऊन जाहीर होणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. परंतु, संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे का? जाणून घ्या...

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) उद्रेक होताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनानं कडक निर्बंध लागू केले आहेत. काही ठिकाणी रात्री संचारबंदी, काही ठिकाणी जनता कर्फ्यू तर काही ठिकाणी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात येत आहेत. सध्या महाराष्ट्रात दररोज सुमारे 16,000 रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात किंवा संपूर्ण राज्यातच लॉकडाऊन जाहीर होणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत. परंतु, संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे का? जाणून घ्या...

भारतात दुसरी लाट आल्याचं दिसून येतय का?

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सद्यस्थिती पाहता ही दुसरी लाट (Second Wave) असल्याचं दिसून येत नाही. हे चुकीचं वर्णन नाही. परंतु, सध्याच्या नवीन केसेस वाढीची तीव्रता आणि वेग प्रत्यक्षात पहिल्या लाटेप्रमाणेच आहे.

देश पहिल्या लाटेप्रमाणे सर्वाधिक रुग्णसंख्येकडे आहे का?

महाराष्ट्राचं उदाहरण पाहता येथे गेल्या सप्टेंबरमध्ये एका दिवसात सुमारे 25,000 केसेस नोंदवल्या जात होत्या. आता महाराष्ट्रात प्रतिदिन सुमारे 16,000 केसेसची नोंद होत आहे. पण ही स्थिती अशीच राहिली, तर काही दिवसांत हा आकडा 20,000 केसेस प्रतिदिनपर्यंत (Cases per day) पोहोचू शकतो. हा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न सुरु असला तरी आपण त्या जुन्या आकड्याकडे वाटचाल करतोय का असा प्रश्न कायम आहे.

(वाचा - एक Blood test वाचवू शकते कोरोना रुग्णांचा जीव; संशोधकांचा दावा)

पहिल्या लाटेच्या तुलनेत नेमका काय फरक आहे?

यात सर्वात महत्वाचा फरक असा की, या विषाणूचा संसर्ग पूर्वीपेक्षा तुलनेनं कमी आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्ण मृत्यूचं प्रमाण म्हणजेच सीएफआर (CFR) घटत आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात गेल्या एक महिन्यात मृत्यूचं प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा कमी असून हे एक आशादायी चित्र म्हणावं लागेल. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी मृत्यूमुखी पडणाऱ्याचं प्रमाण निश्चितच कमी आहे. सध्या सीएफआर स्थितीचं निरीक्षण केलं जात असून, महाराष्ट्रातील 3 ते 4 जिल्हे वगळता अन्य ठिकाणी त्यात घट होत आहे.

लॉकडाऊनचा उपाय पुन्हा स्थिती नियंत्रणासाठी लागू पडू शकतो का?

या टप्प्यावर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन ही योग्य रणनिती आहे असं वाटत नाही. लॉकडाऊन (Lockdown) हे सर्वकाही थांबवण्याचं साधन आहे. जेव्हा आपल्याला या संकटाचा सामना करण्यासाठी तयारी करणं आवश्यक होतं, तेव्हा म्हणजेच साथीच्या पहिल्या टप्प्यात लॉकडाऊन करणं गरजेचं होतं. यामुळे त्या कालावधीत आपल्याला आरोग्य विषयक पायाभूत सुविधा (Medical Infrastructure) सुधारण्यासाठी, रुग्णालयांमध्ये बेडसची संख्या वाढवण्यासाठी, पॅथलॉजी लॅब्सचं नेटवर्क वाढवण्यासाठी, ऑक्सिजन बेडस, व्हेंटिलेटर बेड वाढवण्यासाठी मदत झाली. परंतु, आता ही यंत्रणा अस्तित्वात आहे. त्यामुळे कण्टेंनमेंट धोरणात लॉकडाऊनची भूमिका फारशी मोठी राहिलेली नाही. लॉकडाऊनमुळे सामाजिक आणि अर्थिकदृष्ट्या मोठे दुष्पपरिणाम होताना दिसतात, ते विषाणूपेक्षाही (Virus) भयंकर ठरतात.

अशा वेळी रुग्णवाढीकडे लक्ष देणं ही सर्वात प्रभावी रणनिती ठरते. याचा अर्थ असा की, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर (Contact tracing) भर देणं, तसंच लक्षणं असणाऱ्यांची तपासणी करणं, जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (Home isolation) आहेत, ते नियमांचं पालन करतात की नाही याकडे लक्ष देणं, तसंच तातडीने फिल्ड युनिटस सक्रिय करणं ही काळजी घेतली पाहिजे.

(वाचा - रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस, ट्वीट करत इतरांसाठी लिहिला खास संदेश)

महाराष्ट्रातील कन्टेनमेंट धोरणात काय चुकतंय?

या धोरणात काहीही चुकीचं नाही. भौगोलिक स्थिती, हवामानाचे पॅटर्न्स, आंतरराष्ट्रीय व्यवहार आदी विविध घटकांमुळे वेगवेगळ्या ठिकाणी साथीची स्थिती भिन्न आहे. या कारणांमुळे ही अतिशय गुंतागुंतीची परस्पर क्रिया आहे. त्यामुळे विषाणू स्थितीचा अंदाज घेणं नेहमीच शक्य नसतं. त्यामुळे राज्य किंवा देशाने इतरांपेक्षा वेगळा मार्ग का अवलंबला हे आपल्याला पूर्णपणे समजू शकत नाही.

यात लसीकरणाची भूमिका काय?

लसीकरण (Vaccination) यात सर्वात महत्वाची भूमिका बजावते. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या सिरो सर्व्हेनुसार बहुतांश ठिकाणी 20 ते 25 टक्क्यांपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झालेले आहेत. त्यापैकी बऱ्याच लोकांना रोगप्रतिकार शक्ती प्राप्त झाली आहे. लसीकरणामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली झालेल्या लोकांचं प्रमाण वाढेल आणि आपण अशा टप्प्यावर पोहोचू की हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) आपली भूमिका चांगली बजावू शकेल.

ज्या लोकांनी लसीकरणाचे संपूर्ण डोस घेतले आहेत, त्यांनी देखील काळजी घेणं आवश्यक आहे का?

कोणतीही लस 100 टक्के प्रभावी नाही. कोविड-19 साठीची नाहीच नाही. याचा अर्थ असा की वैयक्तिक पातळीवर लस घेतल्यानंतरही संसर्ग होण्याची शक्यता असते. परंतु, असं होण्याची शक्यता खूपच कमी असते. पण यातही अजून एक अनिश्चितता आहे. लसीमुळे वाढलेली रोगप्रतिकार शक्ती किती दिवस टिकते, या प्रश्नाचं उत्तर अद्याप आपल्याकडे नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोविड-19 शी संबंधित नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.

सध्या लसीकरण फेजमध्येच का केलं जातय? सर्वांनाच लस का दिली जात नाहीये?

लसीच्या चाचण्यांचे परिणाम उत्साहवर्धक असले, तरी आपल्याला अद्याप सावधगिरी बाळगलीच पाहिजे. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांच्यावरील परिणाम तपासणीचा आपल्याकडे थोडाच डेटा उपलब्ध आहे. एईएफआय सर्व्हिलन्स आणि लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा देखरेख करत आहे. ज्यात प्रत्येक प्रतिकूल परिणामांची तपासणी केली जात आहे. याला फार्मिको- व्हिजिगन्स (Pharmaico Vigilance) म्हणतात. कोणतंही नवं औषध किंवा लस लागू पडते की नाही, हे तपासणारी ही अधिकृत यंत्रणा आहे.

तसंच सध्या लसीकरणासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यकता आहे. या लसीकरण मोहिमेतून अधिकाधिक डेटा संकलित केला जातो. त्याचं विश्लेषण केलं जातं, त्यामुळे लसीची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबाबत खात्री मिळते. त्यामुळे लसीकरण टप्प्याटप्प्यानं केलं जात असून एक ते दोन महिन्यांनंतर ते सर्वांसाठी खुलं होईल, अशी शक्यता आहे.

लोकांना अजून किती काळ मास्क वापरावा लागेल?

याबाबत आताच बोलणं अवघड आहे. विषाणूचे अनेक व्हेरियंट्स असून ते अज्ञात किंवा अनिश्चित आहेत. विषाणूचे नवे व्हेरियंट, त्यांच्याविरुध्द लसीचा प्रभावीपणा, लसीकरणातून मिळणाऱ्या प्रतिकारशक्तीचा कालावधी आदी बाबींवर आपल्याला मास्क (Mask) किती दिवस घालावा लागेल, सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) आणि कोरोनाविषयक नियमांचं पालन किती काळ करावं लागेल हे अवलंबून असेल. पण या सर्व घटकांबाबत अजूनही काही निश्चित झालेलं नाही त्यामुळे सर्वांनी घरातून बाहेर पडतान मास्क वापरायचाच आहे आणि कोविडचे नियमही पाळायचे आहेत.

First published: March 15, 2021, 7:38 PM IST

ताज्या बातम्या