जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सुरक्षेसाठी आधुनिक सुविधा असलेल्या कार्सवर अवलंबून राहणं ठरू शकतं घातक; वाचा तज्ञ्जांचं म्हणणं

सुरक्षेसाठी आधुनिक सुविधा असलेल्या कार्सवर अवलंबून राहणं ठरू शकतं घातक; वाचा तज्ञ्जांचं म्हणणं

सुरक्षेसाठी आधुनिक सुविधा असलेल्या कार्सवर अवलंबून राहणं ठरू शकतं घातक; वाचा तज्ञ्जांचं म्हणणं

कार्समध्ये कितीही अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स असल्या तरी त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणं योग्य नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 25 मार्च : आजकाल बहुतांश सर्व कार्समध्ये (Cars) सुरक्षिततेसाठी (Security) अत्याधुनिक सुविधा असतात. यामध्ये इबीडी विथ एबीएस (EBD with ABS), हिल असिस्ट कंट्रोल, कोलिजन वॉर्निंग सिस्टीम, लेन असिस्ट सिस्टीम, सेमी ऑटोनॉमस ड्राईव्ह मोड, सेल्फ पार्किंग (Self Parking) अशा अनेक उच्च दर्जाच्या सुरक्षा फीचर्सचा (Safety Features) समावेश आहे. अमेरिकेत अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, कार्समध्ये देण्यात आलेल्या अशा सुविधांवर पूर्णपणे अवलंबून राहणं योग्य नाही. अभ्यासात आढळलेल निष्कर्ष - इन्श्युरन्स इन्स्टिट्यूट फॉर हायवे सेफ्टी (IIHS) आणि एमआयटी एज लॅब (MIT Age lab) या संस्थांनी एक महिना या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांच्या अनुभवाचा आढावा घेतला. त्यातून असं लक्षात आलं की, असिस्ट सिस्टमची सवय लागल्यामुळे ड्रायव्हर (Driver) गाडी चालवताना सुरक्षेच्या नियमांबाबत फार दक्षता घेत नाही. बहुतांश ड्रायव्हर्स सुरक्षा फीचर्सवरच अवलंबून राहत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांचं लक्ष भरकटत असल्याचंही आढळलं. या अभ्यासासाठी अ‍ॅडॉप्टीव्ह क्रुज कंट्रोल सुविधा असणारी रेंजरोव्हर (Range Rover) आणि पायलट असिस्ट सुविधा असणारी व्होल्वो एस 90 (Volvo S 90) या कार्सचा समावेश करण्यात आला होता.

    (वाचा -  हायवेवर आपात्कालीन परिस्थितीसह नेटवर्कचीही समस्या आहे? जाणून घ्या सोपा उपाय )

    तज्ज्ञांचं मत - या अभ्यासात असं आढळलं की, सुरुवातीला ड्रायव्हर्सनी सेफ्टी फीचर्सवर पूर्ण विश्वास न ठेवता स्वतःच्या ड्रायव्हिंगवर विश्वास ठेवला पण काही काळ गेला तसं ड्रायव्हर्सचं लक्ष भटकू लागलं. याबाबतीत आयआयएचएसचे वरिष्ठ संशोधक इयान रिगेन म्हणाले, पायलट असिस्टचा (Pilot Assist) वापर सुरू केल्यावर ड्रायव्हर्सचं लक्ष भटकायला लागण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

    (वाचा -  या ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केल्यास होणार 1 वर्ष जेल,भरावा लागेल 10000 रुपये दंड )

    सेफ्टी फीचर्सवर डोळे मिटून विश्वास ठेवणं अयोग्य - टेस्ला ऑटो-पायलट, कॅडीलॅक सुपर क्रुझ, मर्सिडीझ बेंझमधील इंटेलिजंट ड्राईव्ह आणि व्होल्व्हो पायलट असिस्ट सिस्टम या सेफ्टी फीचर्सच्या भरवश्यावर कार्समध्ये ड्रायव्हर्स न ठेवणं योग्य ठरणार नाही. सेफ्टी सिस्टम्स आदर्श ठरण्यासाठी अजून काही काळ जाणं आवश्यक आहे. या सिस्टम्स गाडीचा वेग आणि स्टीअरिंगला कंट्रोल करतात. त्यामुळे ड्रायव्हरवर विश्वास ठेवणं अधिक उपयुक्त आहे. कार्समध्ये कितीही अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स असल्या तरी त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवणं योग्य नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात