जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / रिलायन्स JIO चा पोस्टपेड प्लस प्लॅन, 300 जीबी डेटासह मोफत मिळतील या सेवा

रिलायन्स JIO चा पोस्टपेड प्लस प्लॅन, 300 जीबी डेटासह मोफत मिळतील या सेवा

रिलायन्स JIO चा पोस्टपेड प्लस प्लॅन, 300 जीबी डेटासह मोफत मिळतील या सेवा

रिलायन्स जिओने (Reliacne Jio) नुकतेच त्यांचे लेटेस्ट जिओ पोस्टपेड प्लस प्लॅन्स (Postpaid Plus Plans)लाँच केले आहेत. जिओचे हे प्लॅन्स 399 रुपयापासून 1499 रुपयांपर्यंत आहेत

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : रिलायन्स जिओने (Reliacne Jio) नुकतेच त्यांचे लेटेस्ट जिओ पोस्टपेड प्लस प्लॅन्स (Postpaid Plus Plans)लाँच केले आहेत. जिओचे हे प्लॅन्स 399 रुपयापासून 1499 रुपयांपर्यंत आहेत. Jio Postpaid Plus प्लॅनची अशी खासियत आहे की, कंपनी या सर्व प्लॅन्ससोबत लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म असणाऱ्या नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime) आणि डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) चे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. 1499 रुपयांचा Jio Postpaid Plus प्लॅन - रिलायन्स जिओचा 1,499 रुपयांचा जियो पोस्टपेड प्लस प्लॅन एका बिलाच्या कालावधीसाठी वैध आहे, ज्यामध्ये जिओ 300 जीबीचा हाय-स्पीड डेटा ऑफर करत आहे. या योजनेत 300 जीबी डेटा संपल्यानंतर युजर्सना 10 रुपये प्रति जीबी डेटा मिळेल. जिओ पोस्टपेड प्लस योजनेत युजर्स 500 जीबी पर्यंत डेटा रोलओव्हर करू शकतात. या योजनेत, फॅमिली प्लॅन अर्थात अतिरिक्त सिम कार्ड दिले जाणार नाहीत. जिओ प्राइमसाठी द्यावे लागेल वेगळे शुल्क Jio Postpaid Plus प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंगसाठी अनलिमिटेड मिनिट्स मिळत आहेत. याशिवाय एसएमएस (SMS) साठी देखील कोणतीही मर्यादा नाही आहे. यामध्ये जिओ apps चे सब्सक्रिप्शन मोफत आहे. (हे वाचा- Gold Rates Today: सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, इथे वाचा आजचे नवे दर ) जिओच्या या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime, आणि Disney Plus Hotstar VIP चे सब्सक्रिप्शन मोफत मिळते आहे. मात्र युजर्सना जिओ प्राइमसाठी 99 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. जिओच्या या प्लॅनमध्ये अमेरिका, युएईमध्ये मोफत डेटा आणि व्हॉइस कॉलिंगची सेवा देखील उपलब्ध आहे. ग्राहकांची रिलायन्स JIO ला पसंती गेल्या काही महिन्यात जिओने आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांबरोबर काही मोठे करार केले आहेत. दरम्यान सब्सक्रायबर्सची देखील जिओला पसंती मिळते आहे. ट्रायने नुकताच जाही केलेल्या मासिक अहवालानुसार रिलायन्स जिओने जुलै महिन्यात 35 लाखांहून अधिक सबस्क्रायबर मिळवले आहेत. दुसरीकडे व्हीआय (VI) अर्थात वोडाफोन आयडियाने (Vodafone Idea) मात्र, 37 लाख ग्राहक गमावल्याची या अहवालात नोंद आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (TRAI) हा मासिक अहवाल असून यानुसार भारताच्या वायरलेस मार्केटमध्ये 35.03 टक्के वाटा असल्याने जिओ सर्वोच्च स्थानावर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात