Home /News /money /

Gold Rates Today: सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, इथे वाचा आजचे नवे दर

Gold Rates Today: सलग तिसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, इथे वाचा आजचे नवे दर

Gold Silver Rate : गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याचे दर कमी झाले आहेत.

    नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. डॉलरमध्ये (US Dollar) आलेल्या मजबुतीमुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यांनतर या मौल्यवान धातूच्या मागणीमध्येही घट झाल्याचे दिसले. गुरुवारी चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. याआधी बुधवारी आणि मंगळवारी देखील सोन्याचे दर कमी झाले होते. सोन्याचे नवे दर  (Gold Price, 15th October 2020) गुरुवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Rates Today)  प्रति तोळा 32 रुपयांनी कमी झाले आहेत. यांनातर सोन्याची किंमत 51,503 रुपये प्रति तोळा झाली आहे. या आधीच्या सत्रात सोन्याचे दर 51,532 रुपयांवर ट्रेड करत होते. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव 1,901 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा-मोदींनी दिली त्यांच्या संपत्तीबाबतची माहिती, वाचा PM कुठे करतात गुंतवणूक?) चांदीचे नवे दर  (Price, 15th October 2020) दिल्लीतील सराफा बाजारात सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही (Silver Rates Today) घसरण झाली आहे. चांदीचे भाव मोठ्या फरकाने कमी झाले आहेत. चांदी आज 626 रुपयांनी स्वस्त झाली आहे. यांनंतर चांदी 62,410 रुपये प्रति किलोवर आली आहे. याआधीच्या सत्रात चांदीचे दर 63,036 रुपये प्रति किलोग्राम होते. जागतिक बाजारपेठेत चांदी 24.18 डॉलर प्रति औंस आहे. (हे वाचा-2 दिवसात 1000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, वाचा दिवाळीपर्यंत किंती कमी होणार किंमत) एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलरमध्ये आलेल्या मजबुतीमुळे सोन्याचे दर उतरले आहेत. यामुळेच सोन्याच्या दरावर दबाव आहे. सध्या डॉलरमध्ये तेजी कायम आहे. दिवाळीपर्यंत काय असणार सोन्याचे दर? 7 ऑगस्ट 2020 रोजी सो्याचे दर सराफा बाजारात 56,254 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. चांदीचे दर देखील यादिवशी 76,008 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. सोन्याच्या किंमतीवर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी लक्षात घेता सोने आणखी स्वस्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण अनेक देश त्यांची अर्थव्यवस्था मजबुत करण्याच्या प्रयत्नात आहेत. तज्ज्ञांच्या मते पुढील वर्षापर्यंत डॉलरमधील मजबुतीबरोबरच सोन्याच्या किंमतीत अचानक तेजी येऊ शकते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या