मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Jio, Airtel आणि Vi च्या या स्वस्त प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन फ्री

Jio, Airtel आणि Vi च्या या स्वस्त प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime सबस्क्रिप्शन फ्री

ओटीटी प्लटफॉर्म्सचा ट्रेंड लक्षात घेऊन आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) ओटीटी प्लटफॉर्म्सचं मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) देत आहेत.

ओटीटी प्लटफॉर्म्सचा ट्रेंड लक्षात घेऊन आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) ओटीटी प्लटफॉर्म्सचं मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) देत आहेत.

ओटीटी प्लटफॉर्म्सचा ट्रेंड लक्षात घेऊन आता अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) ओटीटी प्लटफॉर्म्सचं मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) देत आहेत.

    नवी दिल्ली, 17 मार्च : आजकाल बहुतांश लोक मोबाइलवर (Mobile) ओटीटी प्लटफॉर्म्सद्वारे (OTT Platforms) उपलब्ध होणारा कंटेंट (Content) बघणं पसंत करतात. इंटरनेट उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही ठिकाणी आपल्याला हव्या त्या वेळी हवा तो कंटेंट बघता येतो. मोबाईल तर सतत आपल्याबरोबर असतोच, त्यामुळे अगदी कमी खर्चात हवा तेव्हा हवा तो कंटेंट बघण्याची सोय झाल्याने ओटीटी प्लटफॉर्म्सची पंसती आणि मागणी वाढली आहे. नेटफ्लिक्स (Netflix), डिस्नी प्लस हॉटस्टार (Disney plus Hotstar) अ‍ॅमेझॉन प्राईम (Amazon Prime), एमएक्स प्लेयर (Max-player) असे अनेक ओटीटी प्लटफॉर्म्स सध्या लोकप्रिय आहेत. यावर टीव्ही चॅनल्सवर दिसणाऱ्या सिरियल्सही पाहता येतात.

    वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट, वेबसिरीज, शोज असा वैविध्यपूर्ण कंटेंट या ओटीटी प्लटफॉर्म्सवर उपलब्ध असतो. त्यामुळे या ओटीटी प्लटफॉर्म्सची प्रेक्षकसंख्या प्रचंड आहे. विशेषतः तरुण वर्गात याची लोकप्रियता मोठी आहे. हा ट्रेंड लक्षात घेऊन आता जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) ओटीटी प्लटफॉर्म्सचं मोफत सबस्क्रिप्शन (Free Subscription) देत आहेत.

    (वाचा - 'एसएमएस'साठी नवे नियम; काय आहे SMS Scrubbing? तुम्हाला कसा होणार फायदा)

    अगदी कमी किमतीच्या प्लॅन्समध्येही लोकप्रिय ओटीटी प्लटफॉर्म्सच्या सबस्क्रिप्शनचा समावेश करण्यात येत आहे. नेटफ्लिक्स, डिस्नी प्लस हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन प्राईम याचं सबस्क्रिप्शन मोफत मिळवायचं असेल, तर रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडीया (Vodafone-Idea-Vi) यांचे काही प्लॅन्स उपलब्ध आहेत.

    रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) 399, 599, 799, 899 आणि 1499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन्सवर (Postpaid Plans) नेटफ्लिक्स, डिस्नी प्लस हॉटस्टार आणि अ‍ॅमेझॉन प्राईम यांचं सबस्क्रीप्शन मोफत आहे. तर कंपनीच्या प्रति महिना 401 रुपयांच्या आणि वर्षाच्या 2599 रुपयांच्या प्लॅन्सवर डिस्नी प्लस हॉटस्टारचं एका वर्षाचं सबस्क्रीप्शन मोफत दिलं जात आहे.

    (वाचा - तो शेर तर तुम्ही सव्वाशेर! या चुका टाळल्यात, तर कधीच होणार नाही ऑनलाईन फसवणूक)

    वोडाफोन-आयडिया Vi (Vodafone Idea) अर्थात वीआयच्या 1099 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनवर नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम यांचं सबस्क्रिप्शन मोफत आहे, तर 401, 501, 601 आणि 801 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्सवर डिस्नी प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मोफत दिलं जात आहे.

    एअरटेलने (Airtel) आपल्या युजर्ससाठी डिस्नी प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मोफत दिलं आहे. एअरटेलच्या 401 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर डिस्नी प्लस हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मोफत मिळत असून, 499 रुपयांच्या प्लॅनवर अ‍ॅमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येत आहे, मात्र एअरटेलच्या कोणत्याच प्लॅनवर नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन मिळत नाही.

    First published:

    Tags: Airtel, Recharge, Reliance Jio, Vodafone idea tariff plan