मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्हालाही असा मेसेज आला का? VIP Numbers द्वारे होतेय मोठी फसवणूक

तुम्हालाही असा मेसेज आला का? VIP Numbers द्वारे होतेय मोठी फसवणूक

आता फसवणूक करणाऱ्यांनी लोकांचे पैसे लुटण्यासाठी व्हीआयपी नंबर्सद्वारे (Vip number's) नवा स्कॅम (Scam) सुरू केला आहे. या फ्रॉडमध्ये आतापर्यंत लाखो लोकांची फसवणूक झाली आहे.

आता फसवणूक करणाऱ्यांनी लोकांचे पैसे लुटण्यासाठी व्हीआयपी नंबर्सद्वारे (Vip number's) नवा स्कॅम (Scam) सुरू केला आहे. या फ्रॉडमध्ये आतापर्यंत लाखो लोकांची फसवणूक झाली आहे.

आता फसवणूक करणाऱ्यांनी लोकांचे पैसे लुटण्यासाठी व्हीआयपी नंबर्सद्वारे (Vip number's) नवा स्कॅम (Scam) सुरू केला आहे. या फ्रॉडमध्ये आतापर्यंत लाखो लोकांची फसवणूक झाली आहे.

नवी दिल्ली, 20 मार्च : ऑनलाईन व्यवहारात जितक्या प्रमाणात वाढ झाली आहे, तितक्याच वेगात ऑनलाईन फ्रॉडचं प्रमाणही वाढलं आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी फ्रॉडस्टर्सकडून विविध मार्ग शोधले जात आहेत. आता फसवणूक करणाऱ्यांनी लोकांचे पैसे लुटण्यासाठी व्हीआयपी नंबर्सद्वारे (Vip number's) नवा स्कॅम (Scam) सुरू केला आहे. या फ्रॉडमध्ये आतापर्यंत लाखो लोकांची फसवणूक झाली आहे.

अशाप्रकारे येतो मेसेज -

अशाप्रकारचा स्कॅम करणारे दोन प्रकारे फसवणूक करतात. पहिलं थेट मेसेज करुन किंवा Whatsapp करुन फसवणूक केली जाते. फसवणूक करणारे एक मोठी लिस्ट देतात, ज्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हीआयपी नंबर ऑफर केलेले असतात. त्यासोबत त्याची किंमतीही दिलेली असते. जो नंबर आवडेल तो पाठवला जाईल असं सांगितलं जातं. त्यासाठी ऑनलाईन पेमेंट करावं लागेल, त्यानंतर रजिस्टर्ड पत्त्यावर सिम पाठवलं जाईल, असं सांगितलं जातं. अनेकांना VIP Numbers ची क्रेझ असल्याने असे लोक या फ्रॉडमध्ये अडकले आहेत.

(वाचा - सोशल मीडियावर कोविड लशीच्या सर्टिफिकेटसह फोटो अपलोड केला असेल तर लगेच हटवा, कारण)

हे फसवणूकीचं काम इतक्या प्रोफेशनली केलं जातं, की कोणताही संशय येणार नाही. केव्हायसीसाठी संपूर्ण कागदपत्रही सबमिट केले जातात. परंतु घरी सिमऐवजी खाली फोल्डर येतं. फ्रॉडस्टर्सकडून मेसेजमध्ये एक लिंक दिली जाते, जी जवळपास खऱ्या सर्विस प्रोव्हायडर्सप्रमाणेच भासते. त्यामुळे लोक खरी लिंक समजून यात फसतात.

अशाप्रकारच्या स्कॅमबाबत गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली असू, मंत्रालयाने यापासून वाचण्यासाठी लोकांना सूचित करण्याचं आवाहन केलं आहे. या मेसेजचा स्क्रिनशॉटही मंत्रालयाकडून शेअर करण्यात आला आहे. अनेकांची अशा स्कॅममध्ये फसवणूक झाली असून त्यांनी मदतीची मागणीही केली आहे.

(वाचा - आता ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी लागू होणार नवे नियम; जाणून घ्या काय होणार बदल)

जर अशाप्रकारे कोणताही मेसेज आला, तर त्याची तक्रार दाखल करावी. गृह मंत्रालयाने सांगितलं की, अशा स्कॅमची तक्रार थेट www.cybercrime.gov.in वर करा. असा फसवणूकीचा मेसेज आला किंवा याद्वारे फसवणूक झाली असली तरीही याबाबत तक्रार दाखल करण्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Online fraud, Online payments