इतरांचं WhatsApp Status तर पाहाल पण Seen लिस्टमध्ये दिसणार नाही तुमचं नाव, पाहा काय आहे Trick
WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp मागील बऱ्याच काळापासून Status फीचरची सुविधा देतं. या सुविधेअंतर्गत युजर्स कोणताही व्हिडीओ, फोटो, टेक्स्ट मेसेज 24 तासांसाठी आपल्या स्टोरीच्या रुपात अपलोड करू शकतात. 24 तासांनंतर पोस्ट केलेली स्टोरी आपोआप गायब होते. आपल्या WhatsApp लिस्टमधील अनेकांचं Status आपण पाहतो आणि आपलंही WhatsApp Status इतर युजर्स पाहतात. स्टेटस पाहणाऱ्यांचं नाव Seen लिस्टमध्ये दिसतं. पण एका ट्रिकद्वारे Seen लिस्टमधील नाव लपवता येतं.
WhatsApp च्या एका ट्रिकद्वारे इतरांचं स्टेटस लपून पाहता येऊ शकतं. म्हणजे तुम्ही एखाद्याचं स्टेटस पाहिलं, तरी Seen लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही.
2/ 4
यासाठी WhatsApp ची Read receipts Setting बदलावी लागेल. त्यासाठी Setting मध्ये Account आणि Privacy ऑप्शनवर क्लिक करा.
3/ 4
आता खाली Read receipts चं फीचर दिसेल. हे ऑन असल्यास, ते Disable करा. आता तुम्ही कोणत्याही कॉन्टॅक्टचं स्टेटस पाहिलं, तरी त्याच्या Seen लिस्टमध्ये तुमचं नाव दिसणार नाही.
4/ 4
महत्त्वाची बाब म्हणजे, या सेटिंगनंतर, तुमचंही WhatsApp Status देखील कोणी पाहिलं, हे तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे तुमचं WhatsApp Status ठेवण्यापूर्वी ही सेटिंग बदलणं फायद्याचं ठरेल.