मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jio ची खास ऑफर, या Recharge Plan वर मिळतोय जबरदस्त कॅशबॅक

Jio ची खास ऑफर, या Recharge Plan वर मिळतोय जबरदस्त कॅशबॅक

Jio 479 रुपये प्रीपेड प्लॅन - जिओचा 479 रुपयांचाही प्रीपेड प्लॅन आहे. याची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे.

Jio 479 रुपये प्रीपेड प्लॅन - जिओचा 479 रुपयांचाही प्रीपेड प्लॅन आहे. याची वॅलिडिटी 56 दिवसांची आहे.

तुम्हीही Jio ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. Reliance Jio 2,999 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2.5GB दररोजच्या डेटासह 20 टक्के कॅशबॅक देत आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 जानेवारी : रिलायन्स जियो (Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी अनेक प्लान आणि ऑफर्स आणत असतं. Jio ग्राहकांना जवळपास प्रत्येक Recharge Plan मध्ये अनेक खास सुविधा दिल्या जातात. तुम्हीही Jio ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. Reliance Jio 2,999 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2.5GB दररोजच्या डेटासह 20 टक्के कॅशबॅक देत आहे. या वर्षाच्या प्रीपेड ऑफरमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा आहे. त्याशिवाय JioMart वर 20 टक्के डिस्काउंटही मिळेल.

2,999 रुपयांच्या या प्रीपेड रिचार्जवर 912.5GB डेटा मिळेल. या Recharge Plan ची वॅलिडिटी 365 दिवस आहे. JioMart वॉलेटवर मिळणाऱ्या 20 टक्के कॅशबॅकचा तुमच्या पुढील रिचार्जसह JioMart आणि रिलायन्स स्टोरवर खरेदीसाठी वापर करू शकता.

हे वाचा - Instagram वर कोणालाही न कळता Secretly पाहता येतील Stories, पाहा काय आहे ट्रिक

या रिचार्जसह युजर्सला 4 Jio App चं सब्सक्रिप्शनही मिळेल. ज्यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सामिल आहे.

दरम्यान Reliance Jio चे काही इतर Recharge Plan देखील आहेत, जे JioMart महा कॅशबॅक ऑफर अंतर्गत मिळतात. यात दुसरी ऑफर 719 रुपयांच्या Plan वर आहे. याची वॅलिडिटी 84 दिवस आहे. यात दररोज 2GB डेटा मिळतो.

हे वाचा - WhatsApp वरुन डाउनलोड करा Corona Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

त्याशिवाय 666 रुपयांच्या Plan मध्ये दररोज 1.5GB डेटा मिळेल. याची वॅलिडिटी 84 दिवस आहे. यात 20 टक्के कॅशबॅक ऑफर मिळते आहे. तसंच 299 रुपयांच्या प्लानची वॅलिडिटी 28 दिवस आहे. यात दररोज 2GB डेटासह इतर फीचर सामिल आहेत.

First published:

Tags: Reliance Jio, Reliance Jio Internet, Tech news