मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /120W सुपरफास्ट चार्जिंगसह लाँच होणार Redmi Note 11 Pro, पाहा काय असेल किंमत

120W सुपरफास्ट चार्जिंगसह लाँच होणार Redmi Note 11 Pro, पाहा काय असेल किंमत

कंपनीने Redmi Note 11 Pro मध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे. ज्यामुळे युजर्सना काही मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन चार्ज करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने Redmi Note 11 Pro मध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे. ज्यामुळे युजर्सना काही मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन चार्ज करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीने Redmi Note 11 Pro मध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे. ज्यामुळे युजर्सना काही मिनिटांमध्ये हा स्मार्टफोन चार्ज करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : सध्या दिवाळी फेस्टिवल सिजन सुरू असल्यामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक कंपन्या आपले वेगवेगळे प्रॉडक्स लॉन्च करत आहे. त्याच सणांच्या पार्श्वभूमीवर आता रेडमी (Redmi Smart Phone) कंपनीने एक धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना फेस्टिव्ह सिजनमध्ये चांगले फीचर्स असणारा मोबाईल खरेदी करता येईल.

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ हे स्मार्टफोन (Redmi smartphone Redmi Note 11 Pro) 28 ऑक्टोबरला चीनमध्ये लाँच होणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा दिली आहे. ज्यामुळे युजर्सना काही मिनिटांमध्ये हा (superfast charging capability) स्मार्टफोन चार्ज करता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनच्या इतरही अनेक जबरदस्त फीचर्सची चर्चा होत आहे.

Google ने जारी केलं Android 12 अपडेट...पाहा फीचर्स

काय आहेत फीचर्स?

Redmi Note 11 Pro या स्मार्टफोनमध्ये 8 GB RAM आणि 128 GB चं स्टोरेज देण्यात आलं आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये NFC आणि ब्लूटूथ v5.2 सोबतच Wi-Fi 6 चा सपोर्ट मिळणार आहे. 3.5MM च्या हेडफोन जॅकमुळेही या स्मार्टफोनच्या फीचर्समध्ये भर पडली आहे.

FBपेपर लीकमधून मोठा खुलासा,Facebookवरुन कमी होतेय तरुणांची संख्या,काय आहेत कारणं

किती असणार किंमत?

Redmi Note 11 Pro ची किंमत 1,199 चीनी युआन म्हणजेच 14000 रूपये असणार आहे. यात 4GB रॅम आणि 128 GB चा स्टोरेज असेल. याशिवाय हा स्मार्टफोन 6GB+128 GB, 8GB+128 GB, आणि 8GB+256 GB मॉडेल्समध्येही लॉन्च होण्याची शक्यता आहे. Redmi Note 11 फोन 28 ऑक्टोबर 2021 ला संध्याकाळी 4 वाजता लॉन्च होणार आहे.

Noise Flair neckband : जबरदस्त फीचर्ससह लॉन्च झाला हा हेडफोन

दरम्यान सध्या रेडमीच्या स्मार्टवॉचचीही चर्चा आहे. स्मार्टवॉच लॉन्च होण्याआधीच त्याची किंमत लीक झाली आहे. चीनमधील वेबसाईट jd.com वर या स्मार्टवॉचची किंमत दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Redmi, Redmi users, Xiaomi redmi