मुंबई, 13 मे : शियोमीचा लोकप्रिय स्मार्टफोन Redmi Note 6 Pro हा चांगल्या आॅफर्ससहित खरेदी करण्याची संधी आलीय. शियोमीच्या आॅफिशियल वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार Redmi Note 6 Proला 2 हजार रुपयांची सवलत मिळतेय. त्यासोबत ग्राहक 2400 रुपयांच्या इंस्टेंट बेनिफिटबरोबर 600GB (6TB )पर्यंत डेटाही मिळवू शकतात.
ग्राहक mi.com वरून शियोमीचे रेडमी नोट 6 प्रो ( 4GB + 64GB )च्या खरेदीवर 11,999 रुपयांत खरेदी करू शकता. लाँचिंगच्या वेळी वेरिएंटची किंमत 13,999 रुपये ठेवली आहे. या हिशेबानं या फोनवर 2 हजार रुपयांची सवलत दिली जातेय. 6GB + 64GB ला फक्त 15,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळतेय.
Redmi Note 6 Pro चे फीचर्स
या फोनमध्ये FHD + रिझोल्युशनबरोबर 6.18 इंचाचा डिस्प्ले आहे.या स्मार्टफोनमध्ये क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन 4 GB RAM + 64 GB आणि 6GB RAM + 64GB स्टोअरेजच्या पर्यायाबरोबर लाँच केलंय. याचं स्टोअरेज 256GB पर्यंत वाढवता येतं.
SBI चं खास सेव्हिंग अकाउंट उघडलंत तर मिळतील 'या' सुविधा
फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे. फोनचा रियर कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॅमेरे दिलेत.
शियोमीनं नुकताच रेडमी नोट 7 प्रो लाँच केलंय. या फोननं बाजारात धूम माजवलीय. या फोनमध्ये 6.3 इंच डिस्प्ले कॉलिंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत मिळेल. याशिवाय यात स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. शाओमीने रेडमी नोट 7 दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. यात 3GB RAM32GB स्टोरेजच्या फोनची किंमत 9,999 रुपये आणि 4GB RAM64GB च्या फोनची किंमत 11,999 रुपये आहे.
खिशात पैसे नसले तरीही जा फिरायला देश-विदेशात, 'या' बँका करतायत मदत
रेडमी नोट 7 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. यातील एक कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. याशिवाय सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. तसेच फोनमध्ये टाइप सी चार्जिंग 3.5 एमएम हेडफोन जॅक, फिंगरप्रिंट सेंसरसारख्या फीचर्सचा सामावेश आहे.
VIDEO : राज ठाकरेंनी मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिला 'हा' सल्ला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Redmi note 6 pro, Xiaomi