मुंबई, 13 मे : सुट्ट्या सुरू झाल्यात. या सुट्टीत तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, पण पुरेसे पैसे तुमच्याकडे नसतील, तरी काळजी करू नका. पण आम्ही तुम्हाला सांगतोय अशा एका ठिकाणाबद्दल जिथून तुम्ही पैसे घेऊन आरामात फिरायला जाऊ शकता. नंतर तुम्ही EMI देऊ शकता.
आपल्या देशात ट्रॅव्हल लोनची लोकप्रियता वाढतेय. कारण पर्यटनासाठी कर्ज सहज उपलब्ध होतंय. ट्रॅव्हल लोनसाठी तुम्ही अर्ज केलात तर ते सहज मिळतं. डिजिटल लेंडिंग प्लॅटफाॅर्म इंडिया लेंड्सनं सादर केलेल्या अहवालानुसार भारतात तरुण सर्वात जास्त ट्रॅव्हल लोन घेतं. पर्यटनासाठी लागणाऱ्या कर्जात 55 टक्के वाढ झालीय. आम्ही तुम्हाला सांगतोय कसं घ्यायचं कर्ज.
IPL 2019 ...म्हणून मुंबई जिंकली, सचिनने सांगितला ‘टर्निंग पॉईंट’
ICICI बँक देते कर्ज
ICICI बँक ग्राहकांना पर्यटन कर्ज देताना फिरण्याचं ठिकाण ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देते. इथे तुम्हाला 20 लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं. शिवाय या कर्जासाठी कुठलीही सिक्युरिटीची गरज लागत नाही. यासाठीचा अर्ज आणि पुढची पद्धत खूप सोपी आहे. याचा व्याज दर 10.99 टक्के प्रति वर्ष सुरू आहे.
Paytmमधून घ्या कर्ज
पेटीएमकडूनही तुम्ही ट्रॅव्हल लोन घेऊ शकता. इथे EMIवर मिळणारा व्याज दर तुमच्या क्रेडिट कार्डावर अवलंबून आहे. ते 13 ते 17 टक्क्यापर्यंत असतं.
IPL 2019 : फायनलनंतर 'हे' खेळाडू झाले मालामाल
बजाजकडून मिळू शकतं 25 लाख कर्ज
बजाज फिनसर्विस पर्सनल लोनद्वारे ग्राहक एकटे किंवा कुटुंबाबरोबर देशात किंवा परदेशात सुट्टीवर जाऊ शकतात. हे कर्ज 5 मिनिटात मान्य केलं जातं. याशिवाय बजाज फिनसर्विस ग्राहकांना तिकीट बुकिंग आणि हाॅटेल्सचीही सोय करून देतं. हे कर्ज जास्तीत जास्त 25 लाख रुपये मिळतं. त्याचा सुरुवातीचा व्याजदर 12.99 टक्के आहे.
पंचांचा वाद संपेना, भडकलेल्या पोलार्डने असा केला निषेध
एक्सिस बँकेचं ट्रॅव्हल लोन
एक्सिस बँक 50 हजार रुपयांपासून ते 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. याचा व्याज दर 15.5 ते 24 टक्क्यांपर्यंत आहे. एक्सिस बँक दोन महिन्यांचा EMI देण्याची सवलत देते. EMI तिसऱ्या महिन्यापासून सुरू होतं.
टाटा कॅपिटलचं कर्ज
टाटा कॅपिटल तुमचं पर्यटनाचं ठिकाण निवडण्याबरोबर 25 लाख रुपयापर्यंत कर्ज देते. व्याज दर 11.49 ते 21 टक्के आहे. याला गॅरंटरची गरज नाही.
SPECIAL REPORT: वृद्ध आई-वडिलांमुळे लग्न जमेना, तरुणाची मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी