मुंबई, 13 मे : भारतीय स्टेट बँक ( SBI ) अनेक लोकांची आवडती बँक आहे. आम्ही तुम्हाला अशा अकाउंटबद्दल सांगतोय, जे तुम्हाला पैशाच्या बचतीसोबत ते वाढवण्याचा पर्यायही देतात. SBIचं सेव्हिंग प्लस अकाउंट मल्टी आॅप्शन डिपाॅझिट ( MOD )शी लिंक होतं. यातली रक्कम जास्त झाली की आपोआप फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये ट्रान्सफर होते. जाणून घेऊ SBI अकाऊंटची खासीयत-
कोण उघडू शकतं खातं?
SBIचं सेव्हिंग अकाउंट कुणीही उघडू शकतं. हे अकाउंट सिंगल किंवा जाॅइंट स्वरूपात उघडता येईल.
खिशात पैसे नसले तरीही जा फिरायला देश-विदेशात, 'या' बँका करतायत मदत
कमीत कमी किती ठेवता येतात पैसे?
या खात्यात कमीत कमी बॅलन्स ठेवणं अनिवार्य आहे. शहरांमध्ये 3 हजार रुपये, निम्न शहरांमध्ये 2 हजार रुपये आणि ग्रामीण शहरांत एक हजार रुपये बँकेनं निश्चित केलेत. सेव्हिंग प्लस अकाउंटमध्ये SBI च्या बचत बँक खात्याप्रमाणे व्याज मिळतं.
नरेंद्र मोदीच नाही तर या नेत्याला देखील व्हायचंय पंतप्रधान; मोर्चे बांधणीला सुरूवात
किती रक्कम होईल ट्रान्सफर?
सेव्हिंग प्लस अकाउंटमध्ये 25 हजार रुपयांच्या वर पैसे जमले तर ते आपोआप फिक्स्ड डिपाॅझिटमध्ये ट्रान्सफर होतात. फिक्स्ड डिपाॅझिट कमीत कमी 10 हजार रुपयांचं असतं आणि ते एक हजार रुपयांच्या मल्टिपलमध्ये होतं.
दारू पिऊन पैसे मागतो, जन्मदात्या आई-वडिलांकडून मुलाची विष पाजून हत्या
मिळते ही सुविधा
सेव्हिंग अकाउंटवाल्यांना मिळणाऱ्या एटीएम कार्ड, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि SMS अलर्ट यांसारख्या सुविधा सेव्हिंग प्लस अकाउंटमध्ये उपलब्ध असतात. यात कर्जाची सुविधाही असते.
मुलीसोबत रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कारने उडवलं, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO