9व्या दिवशी शेअर बाजार घसरण होऊन बंद, गुंतवणूकदारांचे बुडाले 8.56 लाख कोटी रुपये

9व्या दिवशी शेअर बाजार घसरण होऊन बंद, गुंतवणूकदारांचे बुडाले 8.56 लाख कोटी रुपये

शेअर बाजारात सलग 9व्या दिवशीही घसरण पाहायला मिळाली.

  • Share this:

मुंबई, 13 मे : शेअर बाजारात सलग 9व्या दिवशीही घसरण पाहायला मिळाली. 8 वर्षात पहिल्यांदाच 9व्या दिवशी घसरण होऊन बाजार बंद झालाय. दिग्गज शेअर्स ITC, रिलायन्स, ICICI बँक, मारुती, TDS, एसबीआय विकल्यानंतर शेवटी सेन्सेक्स 372.17 पाॅइंट्सनी घसरण होऊन 37,090.82वर बंद झालाय. निफ्टी 130.70 पाॅइंट्सनी खाली येऊन 11,148.20 वर बंद झाला. लागोपाठ 9व्या दिवशी बाजारात गुंतवणूकदारांचे 8.56 लाख कोटी रुपये बुडाले. आज टाटा स्टिल, यस बँक, आयशर मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टिल, इंडसइंड बँक आणि सन फार्मा हे शेअर्स जास्त घसरलेत.भारती इंफ्राटेल आणि टायटन यांचे शेअर्स वधारलेत.

यामुळे' ट्रेनच्या तिकिटांना द्यावे लागतायत विमानापेक्षा जास्त पैसे

गुंतवणूकदारांचे बुडाले 8.50 लाख कोटी रुपये

लागोपाठ 9व्या दिवशी बाजारात घसरण होऊन गुंतवणूकदारांचे 8.56 लाख कोटी रुपये बुडाले. 26 एप्रिलला बीएसईवर लिस्टेड कंपनींचा मार्केट कॅप 1,53,08,828.49 कोटी रुपये होता. 13 मे रोजी बीएसईचा कुल मार्केट कॅप 8,56,318.06 कोटी रुपयांनी घसरून 1,44,52,518.01 कोटी रुपये झाला.

MI vs CSK : ...म्हणून नीता अंबानी आणि रितीका यांनी पाहिला नाही मुंबईच्या विजयाचा ‘तो’ क्षण

आजच्या कारभारात निफ्टीचे इंडेक्स आयटी सोडून सर्व सेक्टरोल इंडेक्स लाल निशाणीवर बंद झाले. पीएसयू बँक आणि फार्मा शेअर्स यांची जोरदार घसरण झालीय. शिवाय तेल गॅल, मेटल आणि पाॅवर इंडेक्स यातही 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली.

LIC पाॅलिसी पसंत नाही? 'अशा' प्रकारे तुम्ही पैसे परत घेऊ शकता

दिग्गज शेअर्सबरोबर मिड आणि स्माॅल कॅप शेअर्सही जोरदार घसरले. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 1.80 टक्के घसरून 14125वर बंद झाला. स्माॅल कॅप इंडेक्स 2.15 टक्के घसरून 13800वर बंद झाला. तेल आणि गॅस शेअर्समध्येही विक्रीसाठी दबाव राहिला. बीएसईचा आॅइल अँड गॅस इंडेक्स 2.25 टक्के घसरून बंद झाला.

आयटी सोडून सर्व सेक्टरोल इंडेक्स लाल निशाणीवर बंद झाले. निफ्टीच्या आयटी इंडेक्समध्ये 0.04 टक्क्यांची वाढ होऊन तो बंद झाला. तर निफ्टीच्या आॅटो इंडेक्समध्ये 2 टक्के, एफएमसीजी इंडेक्स 1.02 टक्के, मेटल इंडेक्स 1.8 टक्के, फार्मा इंडेक्स 4.4 टक्के आणि रियल्टी इंडेक्समध्ये जवळजवळ 2 टक्के घसरण पाहायला मिळालीय.


80 वर्षांच्या आईचं लेकासोबत 10 पुशअ‍प्स, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2019 05:33 PM IST

ताज्या बातम्या