नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : Xiaomi ने भारतात आपला नवा स्मार्टफोन रेडमी नोट 11T 5G (Redmi Note 11T 5G) लाँच केला आहे. Xiaomi ने हा नवा 5G फोन भारतातील सर्वात पॉवरफुल 5G फोन असल्याचा दावा केला आहे.
काय आहेत स्पेसिफिकेशन्स -
- 6.6 इंची फुल-एचडी+ डिस्प्ले
- आस्पेक्ट रेशियो 20:9
- अॅडेप्टिव रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज
- डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
- ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंशन 810 SoC
- त्याशिवाय G57 MC2 GPU आणि 8GB पर्यंत LPDDR4X रॅम
- मल्टीटास्किंगसाठी 3GB पर्यंत अॅडिशनल RAM जोडण्यासाठी फोनमध्ये बिल्ट-इन स्टोरेजचा वापर होतो.
- 5,000mAh बॅटरी
- 33W प्रो फास्ट चार्जिंग सपोर्ट
कॅमेरा -
Redmi Note 11T 5G फोनला डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात f/1.8 लेन्ससह 50 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटर देण्यात आला आहे. फोनला सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा फोन 16,999 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत लाँच करण्यात आला आहे. Xiaomi च्या Redmi Note 11T 5G 6GB/64GB वेरिएंटची किंमत 16,999 रुपये, 6GB/128GB वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. त्याशिवाय याच्या टॉप वेरिएंट 8GB/128GB ची किंमत 19,999 रुपये आहे. फोनवर स्पेशल डिस्काउंट अंतर्गत यावर 1000 रुपयांची सूट आणि ICICI बँकअंतर्गत 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळतो आहे.
हा फोन स्टारडस्ट व्हाइट, अक्वामरीन ब्लू आणि मॅट ब्लॅक कलर वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन 7 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Redmi, Smartphone, Xiaomi redmi