Home /News /technology /

डेटासाठी बंपर ऑफर, 247 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल

डेटासाठी बंपर ऑफर, 247 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 3 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल

टेलिकॉम कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत.

    नवी दिल्ली, 11 मार्च : टेलिकॉम कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर दिल्या जात आहेत. कंपन्यांकडून अनेक प्लॅन लाँच केले जात आहेत. यात आता बीएसएनएलने 247 रुपयांचा स्पेशल टेरिफ व्हाउचरचा प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये 3 जीबी डेटासह अनेक सुविधा मिळणार आहेत. व्हिडिओ पाहणाऱ्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन कंपनीने ही ऑफर दिली आहे. बीएसएनएलच्या 247 रुपयांचा एसटीव्ही प्लॅन 30 दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये कंपनी दररोज 3 जीबी इंटरनेट डेटा आणि 100 एसएमएस फ्री देणार आहे. तसंच दररोज 250 मिनिटे कॉलिंग मिळणार आहे. इतर कंपन्या अनलिमिटेड कॉलिंग देत असल्यानं याबाबतीत प्लॅन कमी वाटू शकतो. कंपनीकडून एसटीवी प्लॅनसह आणखी एक प्लॅन ऑफर केला आहे. 1999 रुपयांच्या प्लॅनमध्ये इतर फायदे वाढवण्यात आले आहेत. एक वर्षासाठी असलेल्या या प्लॅनवर इरोज नाउचे सबस्क्रीप्शन दोन महिन्यांसाठी फ्री मिळणार आहे. 1999 रुपयांत दररोज 3 जीबी डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉल 250 मिनिटे पॅकिंगसह मिळणार आहेत. हे वाचा : jio ला टक्कर देण्यासाठी Vodafoneची धमाकेदार ऑफर, दर दिवशी मिळणार दुप्पट डेटा बीएसएनएलने त्यांचा जुना 998 रुपयांचा प्लॅनही रिवाइज केला आहे. यात आता 30 दिवस अधिक मुदत दिली आहे. 240 दिवसांचा प्लॅन आता 270 दिवसांसाठी मिळणार आहे. ही मुदत 6 जून 2020 पर्यंत असणार आहे. यात युजर्सना दररोज 2 जीबी डेटा मिळणार आहे. हे वाचा : जिओची धमाकेदार ऑफर! 350 जीबी डेटा वर्षभर वापरा, लाँच केले नवीन प्लॅन हे वाचा : Jio, Vodafone, Airtel चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन, डेटासह फ्री कॉलिंग
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या