• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Jio, Vodafone, Airtel चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन, मिळणार डेटा आणि फ्री कॉलिंग

Jio, Vodafone, Airtel चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन, मिळणार डेटा आणि फ्री कॉलिंग

टेलिकम्युनिकेशन कंपन्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन ऑफर करत आहेत. ज्यामध्ये कॉलिंगसह इंटरनेट डेटाही दिला जात आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 मार्च : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टेरिफ चार्जेस वाढवण्यात आल्यानंतर टेलिकम्युनिकेशन कंपन्यांनी त्यांचे अनेक प्लॅन बदलले आहेत. प्रीपेड प्लॅन महागल्यानं कंपन्यांना फटकाही बसत आहे. मात्र, तरीही कंपन्या 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन ऑफर करत आहेत. ज्यामध्ये कॉलिंगसह इंटरनेट डेटाही दिला जात आहे. Airtel चे 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 3 प्लॅन आहेत. यात 19 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्जवर कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिलं जात आहे. या रिचार्जची मुदत दोन दिवस आहे. यावर 200 एमबी डेटा मिळतो. स्मार्ट रिचार्जमध्ये 79 रुपयांचा प्लॅन आहे. यात 64 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. तसंच 200 एमबी डेटा 28 दिवसांसाठी मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग दर एका मिनिटासाठी 60 पैसे इतका आहे. या प्लॅनशिवाय 49 रुपयांचा 28 दिवसांसाठी एक प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये 100 एमबी डेटा आणि 38.52 रुपयांचा टॉकटाइम मिळतो. VODAFONE एअरटेलप्रमाणेच व्होडाफोनचासुद्धा दोन दिवसांच्या मुदतीसाठी 19 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 200 एमबी डेटा मिळतो. तसेच व्होडाफोन प्ले आणि झी5 चे फ्री सबस्क्रिप्शनही मिळते. Jio जिओने 75 रुपयांचा प्लॅन फक्त जिओ फोन युजर्ससाठी दिला आहे. 28 दिवसांच्या मुदतीसाठी असेलेल्या या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा मिळतो. यात 50 फ्री एसएमएस आणि जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 500 मिनिटे मिळणार आहेत. यासोबत जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शनही मिळणार आहे. जिओने त्यांच्या जिओ फोन युजर्ससाठीच कमी किंमतीचे प्लॅन ऑफर केले आहेत. 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये 25 फ्री एसएमएस आणि 7 जीबी डेटा ऑफर दिली आहे. या प्लॅनची मुदत 14 दिवस इतकी आहे. प्लॅनमध्ये जिओ नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आहे. तर इतर नेटवर्साठी 250 मिनिटे मिळतील. या प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. हे वाचा : jio ला टक्कर देण्यासाठी Vodafoneची धमाकेदार ऑफर, दर दिवशी मिळणार दुप्पट डेटा
  Published by:Suraj Yadav
  First published: