मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Realmeच्या फेस्टिव्ह सेलची घोषणा; टीव्ही, फोन, वॉच, इयरफोनवर 5 हजारपर्यंतची सूट

Realmeच्या फेस्टिव्ह सेलची घोषणा; टीव्ही, फोन, वॉच, इयरफोनवर 5 हजारपर्यंतची सूट

जर तुम्ही गॅजेट्स किंवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. रियलमीने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. रियलमीचा हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

जर तुम्ही गॅजेट्स किंवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. रियलमीने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. रियलमीचा हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

जर तुम्ही गॅजेट्स किंवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. रियलमीने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. रियलमीचा हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : जर तुम्ही गॅजेट्स किंवा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. रियलमीने आपल्या फेस्टिव्ह सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये Realmeचे स्मार्टफोन आणि इतर गॅजेट्स स्वस्तात खरेदी करण्याची चांगली संधी आहे. Realmeने त्यांच्या Festive Days with First Sale Offers ची घोषणा केली आहे. रियलमीचा हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.

21 ऑक्टोबरपर्यंत रियलमीचा हा सेल सुरु असणार आहे. या सेलमध्ये पॉप्युलर स्मार्टफोनवर 5 हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. त्याशिवाय सेलमध्ये रियलमी स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टवॉचही बेस्ट ऑफरमध्ये खरेदी करता येऊ शकतात.

Realme 6 वर 1 हजारांची सूट

हा फोन रियलमीच्या खास फेस्टिव्ह सेलमध्ये 1 हजार रुपयांच्या सूटसह खरेदी करता येणार आहे. 6 जीबी रॅम असणाऱ्या वेरिएंटची किंमत 13,999 रुपये आणि 8 जीबी रॅम वेरिएंटची किंमत 15,999 रुपये असेल.

हे वाचा- Anti trust प्रकरण : Google च्या विश्वासार्हतेला तडा?

Realme X50 प्रो वर 5 हजारांची घसघशीत सूट

या फोनच्या दोन्ही वेरिएंट्सवर 5 हजारांची घसघशीत सूट देण्यात येत आहे. Realme X50 प्रो या फोनच्या 8जीबी+128जीबी वेरिएंटची किंमत 41,999 रुपयांवरुन 36,999 रुपये झाली आहे. तर 12जीबी+256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 42,999 रुपयांत मिळणार आहे. सेलदरम्यान हा फोन नो कॉस्ट ईएमआयवरही खरेदी करता येऊ शकतो.

स्मार्ट वॉच आणि इयरबड्सवरही डिस्काऊंट

सेलमध्ये 3,999 रुपयांचं स्मार्टवॉच 1 हजारांच्या सूटसह 2,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतं. तसंच नुकत्याच लॉन्च झालेल्या रियलमी बड्स एयर नियोवरही 1 हजारांची सूट आहे. सूटदरम्यान याची किंमत 2,999 वरुन 1999 इतकी झाली आहे. रियलमी बड्स एयर प्रोवर 500 रुपयांची सूट आहे. त्यामुळे 4999 रुपयांचे रियलमी बड्स सेलमध्ये 4499 रुपयांत मिळणार आहेत.

हे वाचा - आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत iPhone 11; कुठे आणि कधी मिळणार पाहा

रियलमी X3

16 ते 21 ऑक्टोबरदरम्यान या फोनवर 3000 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. सेलमध्ये Realme X3चा 6जीबी+128जीबी फोन 21,999 रुपये आणि 8जीबी+128जीबी वेरिएंट 22,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

हे वाचा - 'या' तारखेपासून flipkartचा Big Billion Days सेल सुरु; बंपर ऑफर्ससह मिळेल कॅशबॅक

स्मार्ट टीव्हीवर 3 हजारांची सूट

सेलदरम्यान Realme Smart TV SLED 4K (55 इंच) 3000 रुपयांच्या सूटसह खरेदी करता येऊ शकतो. सूटमध्ये 42,999 रुपयांचा स्मार्ट टीव्ही 39000 रुपयांत उपलब्ध होणार आहे. तसंच 43 इंची आणि 32 इंची स्मार्ट टीव्हीवरही 1 हजारांची सूट मिळणार आहे.

फ्लिपकार्ट आणि realme.com च्या सेलमध्ये SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्डमधून खरेदी केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट मिळणार आहे.

First published:

Tags: Realme, Realme x50 pro