नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर : अमेझॉन द ग्रेट इंडियन सेलची (Amazon the great indian sale) 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऍपल आयफोन 11 हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. अमेझॉन इंडिया ऍपच्या एका टीझरद्वारे ही माहिती मिळाली असून फेस्टिव्हल सीजनदरम्यान iPhone 11 ची किंमत स्वस्त होणार असल्याचं बोललं जात आहे. Apple iPhone 11 50 हजारहून कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकत असल्याची माहिती मिळत आहे. बॅनरवर फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु ‘ऍपलचा सर्वात पॉवरफुल आयफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत’ असल्याचं सांगण्यात आलं आहे. बॅनरवर 64 GB, iPhone 11 4_999 रुपयांत खरेदी करता येण्याचं सांगण्यात आलं आहे.
हे वाचा - 66 दिवस चालते ‘या’ स्वस्त 4 कॅमेरावाल्या स्मार्टफोनची बॅटरी, कंपनीचा दावा
यावरुवन आयफोन 11, 64 जीबी वेरिएंट 50 हजारहून कमी किंमतीत खरेदी करता येऊ शकत असल्याची हिंट आहे. सध्या भारतात आयफोन 11 ची किंमत 68,300 रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांनी हा फोन अमेझॉन द ग्रेट इंडियन सेलमध्ये खरेदी केल्यास फायदा होऊ शकतो. त्याशिवाय सेलमध्ये या फोनवर ऍडिशनल डेबिड आणि इतर कार्डवर कॅशबॅक-इंस्टंट ऑफर मिळण्याचीही शक्यता आहे. हे वाचा - WhatsApp युजर्ससाठी भन्नाट फिचर, आता एकाच फोनमध्ये असे वापरा दोन अकाउंट Apple iPhone 11 फिचर्स ऍपल आयफोन 11 मध्ये 6.1 इंची लिक्विड रेटिना LCD पॅनल देण्यात आला आहे. Dolby Atmos सह Spatial सपोर्ट आहे. A13 Bionic चीप असून हा कोणत्याही स्मार्टफोनचा आतापर्यंतचा सर्वात फास्ट प्रोसेसर आहे. तसंच 12 मेगापिक्सल कॅमेरा असून त्याला वाईड आणि अल्ट्रा वाईड शॉट अँगल आहे. सेल्फीसाठी आयफोन 11 मध्ये फेस आयडीसह 12 मेगापिक्सल TrueDepth फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.