Home /News /technology /

'या' तारखेपासून flipkartचा Big Billion Days सेल सुरु; बंपर ऑफर्ससह मिळेल कॅशबॅक

'या' तारखेपासून flipkartचा Big Billion Days सेल सुरु; बंपर ऑफर्ससह मिळेल कॅशबॅक

Flipkart Plus कस्टमर्स या महासेलचा लाभ एक दिवस आधीच घेऊ शकणार आहेत.

    मुंबई, 6 ऑक्टोबर : भारतात पाप्युलर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचा Flipkart फेस्टिव्हल Big Billion Days सेल 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. हा सेल 6 दिवसांसाठी असणार आहे. सेलचा शेवटचा दिवस 21 ऑक्टोबर आहे. बिग बिलियन डेज सेलमध्ये TVs & Appliances, Electronics & Accessories, फर्नीचर, Toys, Fashion यांसारख्या अनेक कॅटेगरीजमध्ये अनेक प्रकारच्या ऑफर्स देण्यात येत आहेत. हा सेल Flipkart Plusशी जोडलेल्या प्रीमियम ग्राहकांसाठी एक दिवस आधीच सुरु होणार आहे. यावर्षी आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देण्यासाठी कंपनीने Paytm सह करार केला आहे. याअंतर्गत Paytm Wallet and Paytm UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या खरेदीदारांना अश्योर्ड कॅशबॅक दिला जाणार आहे. हे वाचा - केंद्र सरकारचा मोठा निर्णय; स्ट्रीट फूडचीही होणार होम डिलिव्हरी कोरोनामुळे चिंतेत असणाऱ्या आपल्या ग्राहकांना, या Big Billion Days सेलदरम्यान सर्व वर्गातील ग्राहकांना खास ऑफर देत चांगला पर्याय देत असल्याचं Flipkartकडून सांगण्यात आलं आहे. Flipkart Plus कस्टमर्स या महासेलचा लाभ एक दिवस आधीच 15 ऑक्टोबरपासून घेऊ शकणार आहेत. हे वाचा - सोशल मीडियावर व्हायरल झाल्या 20 हजार रिकाम्या खुर्च्या, वाचा PHOTO मागचं रहस्य No-Cost EMI ऑप्शन Flipkartने फेस्टिव सीजन खास करण्यासाठी यावर्षी 850 शहरांमध्ये 50 हजारहून अधिक किराणा स्टोर्स जोडले आहेत. Flipkartने नो कॉस्ट ईएमआयसाठी बजाज फिनसर्व आणि कॅशबॅकसाठी पेटीएमसह करार केला आहे. Flipkart ने सेल के लिए Paytm के साथ करार किया है. सेलमध्ये No Cost EMI चा ऑप्शन देण्यात आला असून यासाठी फ्लिपकार्टने अनेक बँकांशी पार्टनरशीप केली आहे. यात SBI, ICICI बँक, HDFC बँकचा समावेश आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    पुढील बातम्या