मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /PUBG खेळणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 31 डिसेंबरनंतर बंद होणार गेममधील हे महत्त्वाचं फीचर

PUBG खेळणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 31 डिसेंबरनंतर बंद होणार गेममधील हे महत्त्वाचं फीचर

पबजी मोबाइलवरून बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियामध्ये डेटा ट्रान्सफर करण्याचं फीचर 31 डिसेंबर रोजी बंद केलं जाईल, अशी घोषणा क्राफ्टऑनने केली.

पबजी मोबाइलवरून बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियामध्ये डेटा ट्रान्सफर करण्याचं फीचर 31 डिसेंबर रोजी बंद केलं जाईल, अशी घोषणा क्राफ्टऑनने केली.

पबजी मोबाइलवरून बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियामध्ये डेटा ट्रान्सफर करण्याचं फीचर 31 डिसेंबर रोजी बंद केलं जाईल, अशी घोषणा क्राफ्टऑनने केली.

  नवी दिल्ली, 7 डिसेंबर : या वर्षाच्या (2021) सुरुवातीला भारतात पबजी मोबाईलच्या (PUBG Mobile) बदल्यात 'बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया' (Battlegrounds Mobile India) गेम लाँच करण्यात आला होता. पबजी मोबाईल गेमवर अचानक बंदी घातल्याने लाखो भारतीय वापरकर्त्यांना (Indian Users) जुन्या गेममधील आपल्या डेटाचं काय होईल याची चिंता होती. युजर्सला दिलासा देण्यासाठी, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाने जुना डेटा नवीन गेममध्ये ट्रान्सफर (Data Transfer) करण्याचा पर्याय दिला होता. यामध्ये युजर्सचं रँकिंग, रिवॉर्ड्स, आउटफिट्स, गन्स यासारख्या गोष्टींचा समावेश होता. मात्र, आता हे फीचर बंद करण्यात येत आहे. गेम डेव्हलपर कंपनी (Game Developer) क्राफ्टऑनने (Krafton) जाहीर केलं आहे की, यावर्षी 31 डिसेंबरनंतर डेटा ट्रान्सफर फीचर बंद करणार आहे.

  पबजी मोबाइलवरून बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियामध्ये डेटा ट्रान्सफर करण्याचं फीचर 31 डिसेंबर रोजी बंद केलं जाईल, अशी घोषणा क्राफ्टऑनने केली. कंपनीने याबाबत आपल्या अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे. ज्या खेळाडूंनी PUBG Mobile Normdic Map: Livik (पूर्वीचं अॅप) वापरलं होतं त्यांच्यासाठी गेमप्ले सुरळीत करण्यासाठी, Battlegrounds Mobile India (नवीन अॅप) पूर्वीच्या अॅप अकाउंटमधून काही डेटा ट्रान्सफर करेल, असं क्राफ्टऑनने म्हटलं आहे.

  तुम्हीही Toilet मध्ये Smartphone घेवून जाता का? मग याचे गंभीर परिणाम एकदा वाचाच

  पबजी मोबाइलमधील डेटा बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियामध्ये घेण्यासाठी या वर्षाच्या अखेरीस म्हणजे 31 डिसेंबरपर्यंतच मुदत आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत युजर्स आपला डेटा नवीन अॅपमध्ये इंपोर्ट करू शकतात. भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 जानेवारी 2022ला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत युजर्सना डेटाट्रान्सफर करता येईल. त्यानंतर मात्र, डेटा इंपोर्ट फीचर कायमस्वरूपी बंद केलं जाणार आहे. डेटा ट्रान्सफरसाठी युजरचं ट्विटर अकाउंट गेमसोबत लिंक असणं आवश्यक आहे.

  Facebook CEO च्या सुरक्षेसाठी खर्च होतात इतके अब्ज रुपये, सॅलरी ऐकून बसेल धक्का

  डेटा ट्रान्सफर फीचर अनेकदा वादग्रस्त ठरलं आहे. गेमच्या माध्यमातून चीनमधील (China) सर्व्हरवर डेटा परत पाठवला जात असल्याची नोंद यावर्षाच्या सुरुवातील करण्यात आली होती. बीजिंगमधील चायना मोबाइल कम्युनिकेशन सर्व्हर (China Mobile Communication Server) आणि हाँगकाँगमधील टेनसेंट-रन प्रॉक्सिमा बीटा सर्व्हरचा समावेश आहे. त्यानंतर क्राफ्टऑन आयनसीनंही मान्य केलं होतं की, बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया युनिक गेम फीचर्स देण्यासाठी 'थर्ड पार्टी सोल्युशन्सचा' (third-party solutions) वापर करतं. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून काही डेटा थर्ड पार्टीला पाठवला गेला होता. मात्र, प्रायव्हसी पॉलीसीचं उल्लंघन करून कोणताही डेटा शेअर केला गेलेला नाही, असंही कंपनीनं स्पष्ट केलं होतं.

  2021 मध्ये या Emoji ची जबरदस्त क्रेझ; तुम्हीही याचा सर्वाधिक वापर करता का?

  थर्ड पार्टीसोबत शेअर केलेला डेटा केवळ गेम फीचर्स एनेबल करण्यासाठी उपयोगाचा आहे. आता कंपनीने गेममधील डेटा ट्रान्सफर फीचरचं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनपेक्षित आणि प्रतिबंधित आयपी अॅड्रेसवर ट्रान्सफर होणाऱ्या सर्व प्रकारच्या डेटाचं मॉनिटरींग आणि प्रोटेक्शन कंपनी सुरूच ठेवेल, असं देखील कंपनीनं सांगितलं.

  सप्टेंबर 2020 मध्ये भारतात पबजी मोबाइल या गेमवर सह इतर अनेक चिनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया म्हणून ती पुन्हा लाँच करण्यात आली होती.

  First published:
  top videos

   Tags: PUBG, Pubg game