मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

वर्षभरात स्टार्टअप कंपनीची 100 कोटींची कमाई; सरकारच्या मदतीने तुम्हीही सुरू करा हा Online व्यवसाय

वर्षभरात स्टार्टअप कंपनीची 100 कोटींची कमाई; सरकारच्या मदतीने तुम्हीही सुरू करा हा Online व्यवसाय

 ऑनलाईन फ्यूल डिझेल इंधनाची विक्री (online fuel business) करुन कोट्यवधींची कमाई करता येऊ शकते. जाणून घ्या डोर-टू-डोर फ्यूल विक्रीचा ऑनलाईन व्यवसाय कसा सुरू करता येईल.

ऑनलाईन फ्यूल डिझेल इंधनाची विक्री (online fuel business) करुन कोट्यवधींची कमाई करता येऊ शकते. जाणून घ्या डोर-टू-डोर फ्यूल विक्रीचा ऑनलाईन व्यवसाय कसा सुरू करता येईल.

ऑनलाईन फ्यूल डिझेल इंधनाची विक्री (online fuel business) करुन कोट्यवधींची कमाई करता येऊ शकते. जाणून घ्या डोर-टू-डोर फ्यूल विक्रीचा ऑनलाईन व्यवसाय कसा सुरू करता येईल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 जुलै : तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ऑनलाईन फ्यूल डिझेल इंधनाची विक्री (online fuel business) करुन कोट्यवधींची कमाई करता येऊ शकते. यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), पेट्रोलियम प्रोसेस इंजिनिअरिंग सर्विस को. (PESCO) सारख्या तेल कंपन्या मदत करतील. त्याशिवाय यासाठी सरकारकडूनही मदत मिळू शकते. याबाबत स्टार्टअप कंपनी पेपफ्यूल डॉट कॉमशी (startup Pepfuel.com) चर्चा करण्यात आली. जाणून घ्या डोर-टू-डोर फ्यूल विक्रीचा ऑनलाईन व्यवसाय कसा सुरू करता येईल.

सरकारद्वारा मान्यताप्राप्त स्टार्टअप -

पेपफ्यूल डॉट कॉम (Pepfuel.com) सरकारकडून मान्यताप्राप्त स्टार्टअप आहे. पेपफ्यूलचं इंडियन ऑईलसह थर्ड पार्टी अॅग्रीमेंट आहे. हे डोर-टू-डोर डिलीव्हरीसाठी (online diesel delivery) आहे. या अॅपवर ग्राहक ऑनलाईन किंवा मेसेजद्वारे ऑर्डर करू शकतात. नोएडातील टिकेन्द्र, प्रतीक आणि संदीप या तिघांनी मिळून हे स्टार्टअप सुरू केलं आहे. हा व्यवसाय सुरू केल्यानंतर काही वर्षातच त्यांच्या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 100 कोटींजवळ पोहोचला.

कसा सुरू केला व्यवसाय?

स्टार्टअपचे फाउंडर टिकेन्द्र यांनी सांगितंल, की 'यावर अतिशय रिसर्च केलं गेलं. घरोघरी जाऊन लोकांशी बोलणं केलं, अनेकांचा ऑनलाईन फीडबॅक घेतला. फीडबॅकमध्ये असं सांगितंलं गेलं, की पेट्रोल-डिझेलसाठी ऑनलाईन अॅप असणं गरजेचं आहे. परंतु अशाप्रकारे पेट्रोल-डिझेलच्या ऑनलाईन डिलीव्हरीचा व्यवसाय करणं रिस्की आहे. 2016 पर्यंत देशात पेट्रोल डिलीव्हरीची परवानगी नव्हती. नुकतीच सरकारने यासाठी परवानगी दिली आहे. त्यावेळी आमच्याकडे केवळ डिझेल डिलीव्हरी हा एकमेव पर्याय होता. आम्ही डिझेलच्या डिलीव्हरीसाठी काम सुरू केलं.'

(वाचा - Success Story: लोणार ते लंडन! गावाकडच्या मुलाला प्रतिष्ठित Chevening शिष्यवृत्ती)

तेल कंपन्यांची मदत -

या स्टार्टअप कंपनीचे संदीप यांनी सांगितंल, की आम्ही इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), पेट्रोलियम प्रोसेस इंजिनिअरिंग सर्विस को. (PESCO) सारख्या तेल कंपन्यांना आमच्या सूचना पाठवल्या. त्याशिवाय आमच्या स्टार्टअपची कल्पना PMO कडेही पाठवली. काही दिवसांत PMO कडून उत्तर आलं. दुसरीकडे फरीदाबाद येथील इंडियन ऑईलकडूनही आम्हाला व्यवसायाचे संपूर्ण डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थात DPR पाठवण्याबाबत सांगण्यात आलं. आम्ही आमच्या प्रोजेक्टचा DPR इंडियन ऑईलकडे पाठवला. अप्रुव्हल मिळाल्यानंतर आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला.

First published:

Tags: Petrol and diesel, Start business