Home /News /technology /

पेट्रोल पंपावर ATM Card ने पेमेंट करता? सावधान! अशी होतेय फसवणूक

पेट्रोल पंपावर ATM Card ने पेमेंट करता? सावधान! अशी होतेय फसवणूक

पेट्रोल पंपावर एटीएम कार्डद्वारे पेट्रोलचे पैसे भरणाऱ्या लोकांचं कार्ड क्लोन (ATM card) करुन त्यांच्या खात्यातून ऑनलाइन फ्रॉडद्वारे चोरी केली जात होती.

  नवी दिल्ली, 15 मार्च : ऑनलाइन ट्रान्झेक्शनमध्ये वाढ झाली असताना दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणातही मोठी वाढ झाली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) सक्रिय झाले आहेत. नुकतंच पोलिसांनी अशा सायबर क्रिमिनलला ताब्यात घेतलं आहे जे पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या खात्यातून पैसे चोरी करत होते. एटीएम कार्डद्वारे पेट्रोलचे पैसे भरणाऱ्या लोकांचं कार्ड क्लोन (ATM card) करुन त्यांच्या खात्यातून ऑनलाइन फ्रॉडद्वारे चोरी केली जात होती. या टोळीतील फ्रॉडस्टर्स स्कॅनर मशिनद्वारे (Scanner Machine) एटीएम कार्ड स्कॅन करुन क्लोन करतात आणि ग्राहकांकडून टाकले जाणारे एटीएम पासवर्ड चोरी (ATM Password) करतात किंवा एखाद्या कॅमेऱ्याच्या मदतीने पासवर्ड कॅप्चर करुन खात्यातून पैसे काढतात. या टोळीतील अनेक फ्रॉडस्टर्स नोएडासह अनेक शहरात पेट्रोल पंपावर सेल्समनचं काम करत होते. पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली असून अनेक फ्रॉडस्टर्स फरार आहेत.

  हे वाचा - मोबाइल दुकान चालकाच्या खात्यात सापडलं 300 कोटीचं घबाड, IT च्या नोटिशीतून खुलासा

  कसा केला जात होता फ्रॉड - या फ्रॉडस्टर्सने चौकशीत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेले लोक पेमेंट करताना सेल्समॅनकडे आपलं ATM Card द्यायचे त्यावेळी फ्रॉडस्टर आपल्याकडे असलेल्या स्कॅनर मशीनने ATM Card स्कॅन करत होते आणि त्याच्या मदतीने एटीएमचं क्लोन (Clone Of ATM) तयार करत होते. यात ग्राहकाने ATM चा टाकलेला पीन नंबरही ते पाहू शकत होते. फ्रॉडस्टर्स मुद्दाम ग्राहकांना पुन्हा पीन टाकायला सांगायचे जेणेकरुन योग्य कोड समजू शकेल. किंवा फ्रॉडस्टर अशा ठिकाणी उभे राहायचे जिथे ग्राहक कॅमेऱ्यात कोड टाकताना दिसत असेल.

  हे वाचा - केवळ 1400 रुपयांत घरी आणता येईल AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

  ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितलं, की एटीएम कार्ड क्लोन करण्यासाठी ते मुंबई, महाराष्ट्र आणि कोलकाता इथे राहणाऱ्या मित्रांमार्फत पीडितांच्या खात्यातून पैसे काढत असत. हे फ्रॉडस्टर्स पेट्रोल पंपावर सेल्समन म्हणून काम करतात, जे सामान्य लोकांचं एटीएम कार्ड क्लोन करुन त्यांच्या खात्यातून चोरी करतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: ATM, Cyber crime, Online fraud, Petrol, Tech news

  पुढील बातम्या