नवी दिल्ली, 11 मार्च : होळीच्या निमित्ताने पेटीएमवर ई-कॉमर्स विंग पेटीएम मॉलकडून (Paytm Mall) महाशॉपिंग फेस्टिवल सेलची (Maha Shopping Festival) घोषणा करण्यात आली आहे. सेलदरम्यान ग्राहक विशेष ऑफर अंतर्गत रजिस्ट्रेशन करून 20 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात. कंपनीने आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक लिंक शेअर करुन रजिस्ट्रेशन सुरू केलं आहे. त्याशिवाय पेटीएम मॉलच्या वेबसाईटवरही रजिस्ट्रेशन करता येणार आहे.
60 ते 80 टक्क्यांपर्यंत बंपर डिस्काउंट -
कंपनीने स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि घरगुती उपकरणांवर 60 ते 80 टक्के बंपर सूट मिळणार आहे. paytmmall.com वर सर्व प्रोडक्ट्स असून त्यावर कोणत्या वस्तूवर किती डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळेल, याची माहिती मिळू शकते. टी शर्ट, शर्ट आणि साडीसारख्या अनेक प्रोडक्ट्सवर 60 ते 80 टक्के बंपर डिस्काउंट आहे. स्मार्टफोनवर 60 टक्के सूटसह कॅशबॅक ऑफरही आहे.
iPhone, Samsung आणि Oppo स्मार्टफोनवर 60 टक्के डिस्काउंटसह 4000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर करण्यात आला आहे. हेडसेटवर 60 टक्के, ट्रिमर 50 टक्के, पेन ड्राईव्हवर 30 टक्के आणि पॉवर बँकवर 65 टक्क्यांपर्यंत सूट मिळवता येऊ शकते. त्याशिवाय हेडफोन, हेडसेट, स्पीकर आणि मोबाईल एक्सेसरीजवर 3000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.
Gear up for India's biggest sale! Get access to more than 15000 trusted brands ️ and over 6L free shipping products across categories! Hurry and register for free on the Paytm app to avail exclusive 20% cashback. Click to register https://t.co/UWArwNM33U
— Paytm Mall (@PaytmMall) March 10, 2021
Dell, HP आणि Lenovo लॅपटॉपवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तर प्रिंटरवर 70 टक्के डिस्काउंट मिळतो आहे. AC वर 45 टक्के, फ्रिजवर 35 टक्के, टीव्हीवर 60 टक्के, वॉशिंग मशिनवर 50 टक्क्यांपर्यंत सूट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm, Paytm Money