मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सर्वसामान्यांना आणखी एक फटका; उन्हाळ्यापूर्वीच AC, फ्रिज, कूलर महागणार

सर्वसामान्यांना आणखी एक फटका; उन्हाळ्यापूर्वीच AC, फ्रिज, कूलर महागणार

येणाऱ्या काही महिन्यात AC कंपन्या, किंमतीत वाढ करण्याची योजना आखत आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, कंपन्या एसीच्या किंमती वाढण्याच्या तयारीत आहेत.

येणाऱ्या काही महिन्यात AC कंपन्या, किंमतीत वाढ करण्याची योजना आखत आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, कंपन्या एसीच्या किंमती वाढण्याच्या तयारीत आहेत.

येणाऱ्या काही महिन्यात AC कंपन्या, किंमतीत वाढ करण्याची योजना आखत आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, कंपन्या एसीच्या किंमती वाढण्याच्या तयारीत आहेत.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 11 मार्च : यंदा उन्हाळ्याच्या दिवसांत एसी (air-conditioner- AC), फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मोठा फटका बसू शकतो. येणाऱ्या काही महिन्यात AC कंपन्या, किंमतीत वाढ करण्याची योजना आखत आहेत. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने, कंपन्या एसीच्या किंमती वाढण्याच्या तयारीत आहेत. AC तयार करणाऱ्या कंपन्यांचं असं म्हणणं आहे की, कच्च्या मालाच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी एसीच्या किंमती वाढवणं अनिवार्य आहे.

किती वाढतील किंमती -

AC कंपन्या किंमतीत 4 ते 6 टक्क्यांची वाढ करण्याच्या विचारात आहेत. म्हणजेच एका एसीच्या किंमतीत 1500 ते 2000 रुपयांची वाढ होऊ शकते. सध्या पॉलिमर्स, तांबे, स्टिल, पॅकेजिंग मटेरियलच्या किंमतीत वाढ झाल्याने, उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. तांब्याच्या किंमती रेकॉर्ड स्तरावर पोहचल्या आहेत. त्यामुळे एसी, फ्रिज, कूलर, पंखा यांसारख्या वस्तूंच्या उत्पादनाची किंमत वाढली आहे. त्यामुळेच येणाऱ्या महिन्यात याच्या किंमतीत वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(वाचा - इथे होते Royal Enfield Bullet ची पूजा, वाचा अनोख्या मंदिराची कहाणी)

Lloyd चे सीईओ Shashi Arora यांनी सांगितलं की, या वस्तूंच्या किंमती सतत वाढत आहेत. मागील तीन महिन्यात यात कोणताही बदल झालेला नाही. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने एसी, फ्रिज महागले आहेत. येत्या उन्हाळ्याच्या दिवसांत एसी उद्योगात तेजी आहे. उन्हाळ्याच्या हंगामात एसीच्या किंमतीत उच्च वाढ होण्याची अपेक्षा आहे, असंही अरोरा म्हणाले.

पंखे महागणार -

केवळ एसी, फ्रिजच नाही, तर पंखेही महाग होणार आहेत. स्थानिक स्तरावरील उद्योजकांनी तांब्याच्या दरात वाढ झाल्याने पंख्याच्या किंमती महागणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे ग्राहकांना या महागाईचा फटका बसू शकतो. किंमती वाढल्या तरीही मागणी कमी होण्याची शक्यता नसल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात अजिबात विक्री झाली नव्हती. मात्र या वर्षात जबरदस्त मागणीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(वाचा - हे स्मार्ट हेल्मेट घातल्याशिवाय बाईक स्टार्ट होणार नाही; पाहा भन्नाट VIDEO)

1 एप्रिलपासून टीव्ही महाग -

1 एप्रिल 2021 पासून टीव्हीच्या किंमतीत 2000 ते 3000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. गेल्या 8 महिन्यातच किंमती 3 ते 4 हजार रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे टीव्ही मॅन्युफॅक्चरिंगने टीव्ही पीएलआय स्किम्समध्ये आणण्याची मागणी केली आहे. कमी पुरवठा आणि इतर कारणांमुळे TV पॅनलच्या किंमतीत सतत वाढत असून त्यात दुप्पट वाढ झाली आहे. तसंच कस्टम ड्युटीमध्ये वाढ, तांबे दरात वाढ, अ‍ॅल्युमिनियम, स्टिलसारख्या मटेरियलमुळे इनपुट कॉस्ट अधिक झाल्याने आणि समुद्री वाहतूकीच्या भाड्यात झालेल्या वाढीमुळे TV च्या किंमती सतत वाढत आहेत.

First published: