मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Paytm ची भन्नाट ऑफर; क्रेडिट कार्ड बिल पेमेंटनंतर मिळतील 1 लाखपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या डिटेल्स

Paytm ची भन्नाट ऑफर; क्रेडिट कार्ड बिल पेमेंटनंतर मिळतील 1 लाखपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स, जाणून घ्या डिटेल्स

सध्या पेटीएमवर एक जबरदस्त ऑफर असून पेटीएमद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट केल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स जिंकण्याची संधी आहे.

सध्या पेटीएमवर एक जबरदस्त ऑफर असून पेटीएमद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट केल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स जिंकण्याची संधी आहे.

सध्या पेटीएमवर एक जबरदस्त ऑफर असून पेटीएमद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट केल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स जिंकण्याची संधी आहे.

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : कोरोना काळात ऑनलाईन, डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. सध्या मार्केटमध्ये क्रेड (CRED), पेटीएम (Paytm), मोबिक्विक (Mobikwik), फोनपे (Phonepe), अमेझॉन (Amazon) सारखे अनेक थर्ड पार्टी मोबाईल अॅप आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करू शकता. या पेमेंटनंतर कॅशबॅकही मिळतो. सध्या पेटीएमवर एक जबरदस्त ऑफर असून पेटीएमद्वारे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट केल्यानंतर एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स जिंकण्याची संधी आहे.

मिळालेले कॅशबॅक पॉईंट्स रीडिम करुन ते पेटीएम गिफ्ट व्हाउचर किंवा इतर रिवॉर्ड्समध्ये बदलले जाऊ शकतात. पेटीएमच्या 100 कॅशबॅक पॉईंट्सची व्हॅल्यू 1 रुपयाबरोबर असते. जर तुम्ही 1 लाख कॅशबॅक पॉईंट्स रीडिम करत असाल, तर 1000 रुपयांचं पेटीएम गिफ्ट व्हाउचर मिळवू शकता. हे गिफ्ट व्हाउचर तुमच्या पेटीएम बॅलेन्समध्ये अॅड होतं.

काय आहेत अटी?

- पेटीएमद्वारे तुम्हाला कमीत-कमी 5000 रुपयांच्या क्रेडिट कार्डचं बिल पेमेंट करावं लागेल.

- यात 1000 ते एक लाखपर्यंत कोणतेही कॅशबॅक पॉईंट्स मिळवू शकता. म्हणजेच 10 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत रक्कम मिळवू शकता.

- या ऑफरचा फायदा महिन्याला पाच वेळा घेता येऊ शकतो.

- ही ऑफर काही निवडक युजर्ससाठीच लागू असून 31 ऑगस्टपर्यंत वैध आहे.

WhatsApp हॅक करुन 9 लाखांची फसवणूक, संपूर्ण प्रकार ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

Paytm App वर असं करा क्रेडिट कार्ड बिल पेमेंट -

- सर्वात आधी Paytm App अपडेट करा.

- All Service वर क्लिक करा.

- त्यानंतर Monthly Bills वर क्लिक करा. इथे Credit Card Bill असा पर्याय दिसेल.

- पहिल्यांदा एखाद्या कार्डचं पेमेंट करत असाल, तर Pay Bill For New Credit Card वर क्लिक करा. त्यानंतर कार्ड नंबर टाकून Proceed वर क्लिक करा.

- आता पेमेंट मोड सिलेक्ट करा. नंतर पेटीएम वॉलेट बॅलेन्स, यूपीआय, पेटीएम बँक, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे पेमेंट करा. वॉलेट बॅलेन्समधून पेमेंट केल्यानंतर कोणताही एक्स्ट्रा चार्ज भरावा लागत नाही.

First published:

Tags: Paytm Money, Paytm offers, Tech news