मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp हॅक करुन 9 लाखांची फसवणूक, संपूर्ण प्रकार ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

WhatsApp हॅक करुन 9 लाखांची फसवणूक, संपूर्ण प्रकार ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

ठाण्यात एका फ्रॉडस्टरने एका 60 वर्षीय व्यक्तीची व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp Fraud) माध्यमातून मोठी फसवणूक केली असून 8.98 लाख रुपयांची चोरी केली आहे.

ठाण्यात एका फ्रॉडस्टरने एका 60 वर्षीय व्यक्तीची व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp Fraud) माध्यमातून मोठी फसवणूक केली असून 8.98 लाख रुपयांची चोरी केली आहे.

ठाण्यात एका फ्रॉडस्टरने एका 60 वर्षीय व्यक्तीची व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp Fraud) माध्यमातून मोठी फसवणूक केली असून 8.98 लाख रुपयांची चोरी केली आहे.

  • Published by:  Karishma

ठाणे, 8 ऑगस्ट : सध्या सायबर क्राईम (Cyber Crime), ऑनलाईन फ्रॉडच्या (Online Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. सायबर क्रिमिनल्स (Cyber Criminals) युजर्सची फसवणूक करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहेत. नुकतंच सायबर क्राईमबाबतचं एक प्रकरण ठाणे येथे समोर आलं आहे. ठाण्यात एका फ्रॉडस्टरने एका 60 वर्षीय व्यक्तीची व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp Fraud) माध्यमातून मोठी फसवणूक केली असून 8.98 लाख रुपयांची चोरी केली आहे.

काय आहे प्रकरण?

ठाणे येथे राहणाऱ्या एका 60 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या सौदीमध्ये राहणाऱ्या एका मित्राने 1 ऑगस्ट रोजी मेडिकल कारणासाठी 98 हजार रुपयांची गरज असल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर केला.

दुसऱ्या दिवशी लगेच 2 ऑगस्ट रोजी त्या 60 वर्षीय व्यक्तीने आपल्या मित्राच्या अकाउंटमध्ये 98000 जमा केले. हे पैसे पाठवल्यानंतर काही मिनिटांतच त्यांना मित्राचा पुन्हा मेसेज आला, की त्यांनी चुकून 98000 लिहिलं, त्यांच्या मित्राच्या मुलाच्या ऑपरेशनसाठी 6.98 लाख रुपये पाहिजे होते. 60 वर्षीय व्यक्तीने पुन्हा 6 लाख रुपये आणखी पाठवले.

त्यांच्या मित्राचा 6 लाख रुपये पाठवल्यानंतर पुन्हा एक तिसरा मेसेज आला, की त्यांनी चुकून 1 लाख रुपये सौदी रियाल येथे पाठवले आहेत आणि काही तांत्रिक बिघाडामुळे हे पैसे एक दिवस उशिरा येतील. हे ऐकून ठाण्यात राहणाऱ्या व्यक्तीने आपल्या अकाउंटमध्ये उरलेले 2 लाख रुपयेदेखील आपल्या मित्राला ट्रान्सफर केले.

खोट्या मेलद्वारे अशी होते फसवणूक, Phishing Email नेमका कसा ओळखायचा?

काही वेळात ठाण्यात राहणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्या सौदीतील मित्राच्या पत्नीचा मेसेज आला, की त्यांच्या पतीचं व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक (WhatsApp Account Hack) झालं आहे आणि हॅकर त्यांच्या अकाउंटमधून लोकांना मेसेज करुन पैसे मागत आहेत. त्यानंतर ठाण्यात राहणाऱ्या व्यक्तीला त्यांची फसवणूक झाल्याचं समजलं. व्हॉट्सअ‍ॅपवर पैशांची मागणी करणारा आपला मित्रच असल्याचं समजून त्यांनी इतकी मोठी रक्कम कोणतीही विचारपूस न करता ट्रान्सफर केली.

या फसवणुकीनंतर त्यांनी या सायबर क्राईमबाबत नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केली असून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

SIM वेरिफिकेशनसाठी मागितले 11 रुपये, पण डॉक्टरच्या खात्यातून तब्बल 6 लाख गायब

दरम्यान, Facebook आणि WhatsApp द्वारे पैशांची मागणी करत फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे कोणीही पैशांची मागणी अशाप्रकारे सोशल मीडियावर केल्यास, त्या संबंधित व्यक्तीला थेट कॉल करुन याबाबत चौकशी करणं गरजेचं आहे. फ्रॉडस्टर्स अकाउंट हॅक करुन त्या व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी करतात. त्यामुळे आधी शहानिशा करणं आवश्यक असून लगेच पैसे ट्रान्सफर करणं टाळा.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, Whatsapp chat, Whatsapp News, WhatsApp user