Home /News /technology /

आता घरबसल्या कर्ज घ्या, तेही बिनव्याजी; Paytm ची धमाकेदार योजना

आता घरबसल्या कर्ज घ्या, तेही बिनव्याजी; Paytm ची धमाकेदार योजना

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांसमोर निर्माण झालेली आर्थिक अडचण लक्षात घेऊन पेटीएमनं ‘पोस्टपेड मिनी’ (Postpaid Mini) नावाची एक अत्यंत उपयुक्त योजना दाखल केली आहे.

नवी दिल्ली 12 जुलै: देशातील आघाडीचा डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएम (Paytm) सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणत असतो. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांसमोर निर्माण झालेली आर्थिक अडचण लक्षात घेऊन पेटीएमनं ‘पोस्टपेड मिनी’ (Postpaid Mini) नावाची एक अत्यंत उपयुक्त योजना दाखल केली आहे. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या मासिक खर्चासाठी अगदी किरकोळ 250 रुपयांपासून ते 1000 रुपयांचे कर्ज मिळू शकते तेही बिनव्याजी. थोडक्यात पेटीएम किरकोळ रकमेची उधार उसनवार देणाऱ्या आपल्या मित्रासारखे आपल्या मदतीला धावून आले आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कमी किमतीची कर्जे त्वरित उपलब्ध करणाऱ्या आपल्या ‘बाय नाऊ, पे लेटर’ (Buy Now Pay Later) या सेवेचाच हा विस्तार असून, आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडशी (Aditya Birla Finance Limited) भागीदारीत ही योजना दाखल करण्यात आल्याचं पेटीएमनं म्हटलं आहे. युजर्सना देशभरातील ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये पेमेंटची सुविधा देणाऱ्या पेटीएम पोस्टपेडचाच (Paytm Postpaid) हा एक भाग आहे. या पोस्टपेड मिनी योजनेत मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज, गॅस सिलिंडर बुकिंग, वीज, पाणी बिल अशा खर्चासाठी कर्ज देण्यात येईल. त्यावर 30 दिवसांपर्यंत कोणत्याही व्याज आकारले जाणार नाही. पोस्टाच्या या योजेनेतून वर्षाला मिळवता येतील 60 हजार रुपये; असा होईल डबल फायदा कोणीही पेटीएम युजर या योजनेचा लाभ घेऊ शकेल. 60 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज यात मिळू शकते. तर 250 ते 1000 रुपयांची रक्कम तत्काळ मिळू शकते. कर्ज परतफेडीचा कालावधी 30 दिवस असून, त्या कालावधीत कर्ज फेडल्यास काहीही व्याज लागणार नाही. याकरता फक्त किरकोळ सेवा शुल्क द्यावे लागेल. या व्यतिरिक्त, ग्राहकांना कोणतेही वार्षिक शुल्क किंवा कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क द्यावे लागणार नाही. पेटीएमची ही सेवा देशातील 550 शहरांमध्ये उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी पेटीएम मिनी अ‍ॅप अकाउंटवर (Paytm Mini App Account) नोंदणी करा. याकरता पेटीएम बिझिनेस डॅशबोर्डला (Paytm Business Dashboard) भेट द्या. त्यानंतर खालील प्रक्रिया पूर्ण करा. भारतात येतेय आणखी एक विमान कंपनी, मल्ल्यानंतर ‘आकाश’भरारीसाठी ‘बिग बुल’ सज्ज - अ‍ॅप क्युआर (App QR): आवश्यक अ‍ॅप उघडण्यासाठी याचा वापर केला जाईल. - मिनी अ‍ॅप आयडी: मिनी अ‍ॅपसाठीचा हा अॅप आयडी (App ID) तुम्हाला पेटीएमकडून मिळणाऱ्या कोणत्याही सेवेसाठी आवश्यक आहे. - ऑथेंट क्लायंट आयडी आणि क्लायंट सिक्रेट: मिनी अ‍ॅपवरील लॉगिन फ्लो इंटीग्रेशनसाठी हे आवश्यक आहे. - पीजी एमआयडी आणि की: मिनी अ‍ॅपद्वारे होणाऱ्या पेमेंटसाठी या आवश्यक बाबी आहेत. यानुसार नोंदणी झाल्यानंतर पेटीएम अँड्रॉइड अ‍ॅपचा उपयोग करून क्युआर कोड स्कॅन करा. मिनी अ‍ॅप कार्यरत होण्यासाठी लॉगिन इंटीग्रेशन आणि पेमेंट इंटीग्रेशनची गरज आहे. यानंतर तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या आवश्यकतेनुसार तत्काळ कर्जाऊ रक्कम पेटीएमकडून मिळवू शकता. सध्याच्या काळात काही क्षणात अशी आर्थिक मदत देणारी ही सुविधा अतिशय मोलाची आहे. अनेक गरजूंना ही योजना अत्यंत उपयोगाची ठरेल.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Loan, Paytm, Paytm Money

पुढील बातम्या