नवी दिल्ली, 6 जुलै : जर तुम्ही पेटीएम युजर (Paytm User) असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. पेटीएमवर (Paytm) आता काही मिनिटांतच लोन उपलब्ध होणार आहे. पेटीएमने आपल्या बाय नाउ, पे लेटर (Buy Now, Pay Later service) सर्विसचा विस्तार करुन पोस्टपेड मिनी (Postpaid Mini) लाँच केलं आहे. याद्वारे कंपनी छोटी-मोठी कर्ज देणार आहे. कंपनीने यासाठी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडसह (Aditya Birla Finance Ltd) पार्टनरशिप केली आहे. कंपनीने सांगितलं, की छोट्या टिकीट तात्काळ लोनमुळे (small-ticket instant loans) ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल आणि कोरोना व्हायरसच्या काळात घरगुती खर्चांची सोय होण्यास मदत होईल.
पोस्टपेड मिनी लाँचसह कंपनी 60000 रुपयांपर्यंतच्या तात्काळ क्रेडिटशिवाय 250 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत लोन देईल. हे लोन युजर्सला मोबाईल-DTH रिचार्ज, गॅस सिलेंडर बुकिंग, विज आणि पाणी बिलसारख्या मासिक बिलांचं पेमेंट करण्यासाठी मदत करेल. तसंच ग्राहक पेटीएम पोस्टपेड मिनीसह पेटीएम मॉलवरही खरेदी करू शकतात.
30 दिवसांपर्यंत कोणतंही व्याज नाही -
पेटीएम पोस्टपेड सर्विसद्वारे शून्य टक्के व्याजावर 30 दिवसांपर्यंतची ऑफर मिळत आहे. यात कोणतीही वार्षिक फी किंवा अॅक्टिवेशन चार्ज नाही. यात केवळ एक सुविधा शुल्क (convenience fee) भरावं लागेल. पेटीएम पोस्टपेडद्वारे युजर्स देशभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन मर्चेंट स्टोरवर पेमेंट करू शकतात. Paytm Postpaid देशातील 550 हून अधिक शहरांत उपलब्ध आहे.
दरम्यान, डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्ष पूर्ण (Digital India program Completed 6 years) झाल्यानिमित्त देशातील आघाडीचा डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) ग्राहक आणि व्यापार्यांसाठी तब्बल 50 कोटी रुपयांची कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) आणली आहे. देशाच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी असलेलं आणि डिजिटल इंडिया अभियान यशस्वी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना ओळख मिळवून देण्यासाठी पेटीएमनं ही गॅरंटीड कॅशबॅक ऑफर आणली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm, Paytm Money, Paytm offers, Tech news