नवी दिल्ली, 5 जुलै: डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्ष पूर्ण (Digital India program Completed 6 years) झाल्यानिमित्त देशातील आघाडीचा डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) ग्राहक आणि व्यापार्यांसाठी तब्बल 50 कोटी रुपयांची कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) दाखल केली आहे. शुक्रवारी पेटीएमने ही धमाकेदार ऑफर दाखल केली. व्यापारी आणि ग्राहकांना पेटीएम अॅपद्वारे करण्यात आलेल्या प्रत्येक व्यवहारासाठी कॅशबॅक ऑफरचा लाभ मिळणार आहे, असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी 200 पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये व्यापाऱ्यांना प्रशिक्षण (Digital Training) देण्याचा उपक्रमही राबवण्यात येणार असून, याकरता कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
दोन कोटी व्यापाऱ्यांना होईल लाभ -
या गॅरंटीड कॅशबॅक ऑफरसाठी 50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, कंपनीतर्फे व्यापाऱ्यांना साऊंडबॉक्स (Soundbox) आणि आयओटी डिव्हाईस (IOT Device) यासह अनेक बक्षिसं देण्यात येणार आहेत. दररोज पेटीएम वापरणार्या 2 कोटी व्यापाऱ्यांना अधिक लाभ होईल. दिवाळीपूर्वी पेटीएम अॅपद्वारे सर्वाधिक व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना उत्कृष्ट व्यापारी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलं जाईल.
WhatsApp वर का ब्लॉक होत नाहीत Screenshot; हे आहे कारण
सहा महिन्यांसाठी गॅरंटीड कॅशबॅक -
कोणत्याही स्टोअरमध्ये पेटीएम क्यूआर कोड स्कॅन (Paytm QR code) करून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी कॅशबॅकचा लाभ मिळेल. ही कॅशबॅक ऑफर सहा महिन्यांपर्यंत राहिल. कंपनी पात्र व्यापाऱ्यांना 50 टक्के सवलतीसह आपला साउंडबॉक्स देईल. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पेटीएमने युपीआय, वॉलेट आणि रूपे कार्डसाठी क्यूआर कोडवर शून्य एमडीआर उपलब्ध केलं आहेत.
डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही ऑफर -
डिजिटल इंडिया अभियानाला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कंपनीनं ही ऑफर बाजारात आणली असून, ज्याचा उद्देश भारताच्या अंतर्गत भागातही ऑनलाईन पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि डिजीटल कौशल्यं सुधारणं हा आहे. मेड इन इंडिया कंपनी असलेल्या पेटीएमला यात सहभागी असण्याचा अभिमान आहे. देशाच्या प्रगतीत आपलं योगदान देण्यासाठी कंपनी अत्याधुनिक डिजीटल सुविधा उपलब्ध करून उद्योजकांना प्रोत्साहित करत आहे. याकरता कंपनीने वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स, यूपीआय, नेट बँकिंग, पेटीएम पोस्टपेड अशा अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
Online Fraud चा नवा प्रकार; कॅश ऑन डिलीव्हरीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक
डिजिटल इंडिया अभियानात महत्त्वपूर्ण विकास -
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी म्हटलं आहे की, भारताने आपल्या डिजीटल इंडिया अभियानात अत्यंत महत्त्वपूर्ण प्रगती केली असून, तंत्रज्ञानाच्या सहकार्याने सर्वांचं सक्षमीकरण केलं आहे. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेत या अभियानाचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देशात डिजिटल पेमेंटची नव्यानं व्याख्या करून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमधील एक महत्त्वाचा घटक असण्याचा आम्हाला अभिमान आहे. देशाच्या प्रगतीच्या केंद्रस्थानी असलेलं आणि डिजिटल इंडिया अभियान यशस्वी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांना ओळख मिळवून देण्यासाठी पेटीएमनं ही गॅरंटीड कॅशबॅक ऑफर आणली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Paytm, Paytm offers, Tech news