Home /News /technology /

तुमच्या चालण्याचंही मोजपाप करणार Google, लाँच केलं Paced Walking फीचर

तुमच्या चालण्याचंही मोजपाप करणार Google, लाँच केलं Paced Walking फीचर

युजर जेव्हा चालतो तेव्हा तो किती वेगाने चालतो याची संपूर्ण माहिती त्याला पेस्ड वॉकिंग फीचरमुळे मिळणार आहे. समजा युजर चालत आहे आणि त्याला पेस्ड वॉकमध्ये लक्षात आलं की त्याचा चालण्याचा वेग कमी झालाय किंवा नेहमीपेक्षा जास्त आहे तर तो वेग वाढवू किंवा कमी करू शकतो

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 जून: दिवसेंदिवस विकसीत होणारं तंत्रज्ञान माणसाचं आयुष्य सोपं करत आहे. आता स्मार्ट वॉच किंवा तुमच्या फोनमधील अॅपच्या माध्यमातून तुम्ही किती पावलं चाललात हे मोजणं ही नवी गोष्ट राहिलेली नाही. सध्या तंदुरुस्तीबाबत जागरुक असणारी मंडळी (Fitness Conscious) भेटली की आपण किती पावलं किती वेळात चाललो याचीच चर्चा करताना दिसतात. कोरोनाच्या काळात घराबाहेर पडता आलं नाही तरीही घरातल्या घरात व्यायाम करायचा सल्ला डॉक्टर देत आहे. त्यावेळी या स्टेप्स म्हणजे पावलं मोजणाऱ्या अॅप्सचा सगळ्यांनीच भरपूर वापर केला. अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी गुगलने (Google)  आता आणखी एक नवं फीचर बाजारात आणलं आहे. गुगलने लाँच केलेलं पेस्ड वॉकिंग (Paced Walking) हे फीचर तुम्ही चाललेल्या प्रत्येक पावलाबद्दल अचूक आणि सखोल माहिती देणार आहे. यामध्ये ऑडिओ बिट्सचा वापर करून युजरची पावलं ट्रॅक करता येतात. गुगल फिटमध्ये आणि त्याचबरोबर जगभरातील अँड्रॉइड फोनमध्येही गुगल पेस्ड वॉक हे फीचर उपलब्ध होणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. हे वाचा-...तर तुम्हाला CO-WIN वर ब्लॉक करणार; कोरोना लशीच्या नोंदणीबाबत नवा नियम या फीचरचा फायदा काय? युजर जेव्हा चालतो तेव्हा तो किती वेगाने चालतो याची संपूर्ण माहिती त्याला पेस्ड वॉकिंग फीचरमुळे मिळणार आहे. समजा युजर चालत आहे आणि त्याला पेस्ड वॉकमध्ये लक्षात आलं की त्याचा चालण्याचा वेग कमी झालाय किंवा नेहमीपेक्षा जास्त आहे तर तो वेग वाढवू किंवा कमी करू शकतो. जेणेकरून त्याचा चालण्याचा वेग कायम राहील. अगदी नैसर्गिकपणे माणूस जसा चालतो त्याप्रमाणेच या फीचरमध्ये माणसाच्या चालण्याचा वेग मोजला जातो. गुगल फिटमध्ये (Google Fit) मेडिकल लीड म्हणून काम करणारे कपिल प्रकाश म्हणाले, ‘जर युजरला वेगाने चालायची सवय असेल तर त्याचा नॅचरल वेग वेळेनुसार अधिक वेगवान होत जाईल. या फीचरमुळे युजरला सायकल रायडिंग संदर्भात अनेक हेल्थ बेनिफिट्स मिळतात. ’ हार्ट पॉइंट्सची कमाई युजरला या फीचरचा वापर केल्यावर तंदुरुस्ती मिळणार आहेच पण त्याला आणखीही फायदा होणार आहे. तो म्हणजे युजरला पेस्ड वॉकिंग फीचर वापरल्यानंतर हार्ट पॉइंट्स (Heart Points) मिळणार आहेत. गुगल फीटमध्ये जर युजरनी पेस्ड वॉकिंग हे फीचर वापरलं आणि तो चालला तर त्याला प्रत्येक मिनिटाला जास्तीत जास्त हार्ट पॉइंट्स मिळू शकतील. हे पॉइंट्स मिळवण्यासाठी युजरला एका मिनिटात 100 हून अधिक पावलं चालणं गरजेचं आहे. जर तो ते करू शकला तर त्याला एका मिनिटासाठी एक हार्ट पॉइंट मिळेल. या हार्ट पॉइंट्सचा त्या अॅपमध्येच पुढे उपयोग करता येईल. हे वाचा-धक्कादायक! Facebook वरून हेरली जात आहेत देहविक्रयासाठी मुलं तुमच्या चालण्यानुसार करा वापर युजर जर गुगल पेस्ड वॉक फीचरचा वापर करत असेल तर त्याला बिट्सचा स्पीड कमी जास्त करता येईल. म्हणजे युजरच्या चालण्याच्या वेगानुसार तो बिट्स ठरवू शकेल. तसंच चालताना संगीत किंवा पॉडकास्ट (Music or Podcast) ऐकायची सवय अनेकांना असते. तर तुम्हाला या फीचरमध्ये ते ऐकायची सोयही आहे. त्यामुळे पेस्ड वॉकिंग हे गुगलचं फीचर तंदुरुस्तीबाबत जागरुक लोकांसाठी फारच फायद्याचं ठरणार आहे.  अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि जागतिक आरोग्य संघटनेने असा सल्ला दिला आहे की प्रत्येक व्यक्तीने आठवड्यात कमीत-कमी 150 मिनिटं तरी शारीरिक हालचाल करणं आरोग्यासाठी गरजेचं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या