...तर तुम्हाला Co-win वर ब्लॉक केलं जाणार; कोरोना लशीच्या नोंदणीबाबत मोदी सरकारचा नवा नियम

...तर तुम्हाला Co-win वर ब्लॉक केलं जाणार; कोरोना लशीच्या नोंदणीबाबत मोदी सरकारचा नवा नियम

CO-WIN वर कोरोना लशीच्या नोंदणी प्रक्रियेत तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जून : कोरोना लस (Corona vaccine) घेण्यासाठी भारत सरकारच्या CO-WIN पोर्टलवर नोंदणी करता येते. पण आता नोंदणीबाबत मोदी सरकारने नवा नियम जारी केला आहे. या पोर्टलवर नोंदण प्रक्रियेत तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते, तुम्हाला पोर्टलवर ब्लॉक (CO-WIN will block users) केलं जाईल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.

कोरोना लशीसाठी काही लोक वारंवार स्लॉटसाठी (Corona vaccine slot) प्रयत्न करत आहेत, अनेक वेळा ओटीपी जनरेट करत आहेत. स्लॉटसाठी 24 तासांत 1000 पेक्षा जास्त वेळा प्रयत्न करणाऱ्या लोकांना आणि 24 तासांत 50 पेक्षा जास्त ओटीपी जनरेट करणाऱ्या युझर्सना  को-विन पोर्टल यापुढे ब्लॉक करणार आहे.

या पोर्टलवरून संबंधित युझर्सना केवळ 24 तासांसाठीच ब्लॉक केलं जाईल. याशिवाय को-विन पोर्टलवर 15 मिनिटांत 20 पेक्षा जास्त वेळा सर्च रिक्वेस्ट (search request) पाठवल्यास सिस्टम युझरला लॉग आउट (log out) करेल, असं एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

हे वाचा - कोरोना काळात 28 टक्क्यांनी वाढले Online Fraud, देशाचं 25 हजार कोटींचं नुकसान

हा उपाय को-विन पोर्टलवर ऑटोमेट स्लॉट बुकिंगसाठी बॉट्स तसंच स्क्रिप्ट रोखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. बुकिंग स्लॉटला मॅन्युअलपणे करणाऱ्या लोकांना बॉट्ससोबत स्पर्धा करावी लागू नये हा आहे, यामागी हेतू आहे. असं त्यांनी सांगितलं.

वेबसाइट वर आधीच पोर्टलवर उपलब्ध स्लॉटसाठी (public search option for available slots) पब्लिक सर्चचं एक ऑप्शन आहे. जिथं युझर्स लॉगइन न करताही स्लॉट सर्च करू शकतात. याशिवाय खूप कमी वेळात स्लॉटसाठी 20 किंवा त्यापेक्षा जास्त रिक्वेस्ट करणारे युझर्स बॉट अॅक्टिव्हिटीचा संशय वाढवतात. एकापेक्षा जास्त अ‍ॅप्सवरून लशीसाठी स्लॉट बुक करण्याची सोय असल्यामुळे लोकांना लशीचे स्लॉट शोधणं जास्त सोपं जातं, असंही या अधिकाऱ्याने म्हटलं.

हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता Monkeypox; किती खतरनाक आहे हा व्हायरस पाहा

नुकतंच केंद्र सरकारने को-विन पोर्टलसाठी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्या थर्ड पार्टीला आपल्या अॅपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन (registration), शेड्यूलिंग (scheduling) आणि व्हॅक्सिनेशन मॅनेजमेंट एनेबल करण्याची परवानगी देतात. हे सध्याच्या फ्रेमवर्कसाठी एक अपडेट आहे. कारण यापूर्वी डेव्हलपर्स फक्त उपलब्ध असलेल्या स्लॉटबद्दलची माहिती आणि अॅपच्या माध्यमातून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड (download of vaccination certificates) करण्याची सुविधा देऊ शकत होते. याआधी सरकारच्या आरोग्य सेतू (Aarogya Setu) आणि उमंग (Umang) या दोन अॅपच्या माध्यमातून युझर्स को-विन (Co-WIN) शिवाय रजिस्ट्रेशन आणि कोविड-19 व्हॅक्सिन अपॉइंटमेंट बुक करू शकत होते.

Published by: Priya Lad
First published: June 11, 2021, 7:46 PM IST

ताज्या बातम्या