मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Oxygen Concentrators खरेदी करताना केली जातेय फसवणूक, Scam पासून वाचण्यासाठी या टिप्स पाहाच

Oxygen Concentrators खरेदी करताना केली जातेय फसवणूक, Scam पासून वाचण्यासाठी या टिप्स पाहाच

ऑक्सिजन कंसंट्रेटर विकत घेताना अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीची गरज असताना, त्यांच्या अशा परिस्थितीचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.

ऑक्सिजन कंसंट्रेटर विकत घेताना अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीची गरज असताना, त्यांच्या अशा परिस्थितीचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.

ऑक्सिजन कंसंट्रेटर विकत घेताना अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीची गरज असताना, त्यांच्या अशा परिस्थितीचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.

नवी दिल्ली, 23 मे : भारतात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मोठ्या संख्येने लोक कोरोनाबाधित होत असून या दुसऱ्या लाटेत कोरोना मृतांची संख्याही वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे हॉस्पिटल बेड्सपासून ऑक्सिजन सिलेंडरपर्यंत, औषधं यासारख्या अनेक गोष्टींची कमतरता भासत आहे. अशात घरीच कोरोनावर उपचार करणारे, रिकव्हर होणारे रुग्ण ज्यांची ऑक्सिजन लेवल 90 च्या वर आहे, ते ऑक्सिजन कंसंट्रेटर (Oxygen Concentrators) विकत घेण्याचा विचार करू शकतात.

बाजारात अनेक प्रकारचे ऑक्सिजन कंसंट्रेटर (Oxygen Concentrators) उपलब्ध आहेत. मेडिकल जाणकाराच्या सल्ल्याने हे विकत घेऊ शकता. परंतु ऑक्सिजन कंसंट्रेटर विकत घेताना अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना मदतीची गरज असताना, त्यांच्या अशा परिस्थितीचा फायदा फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेऊन, फसवणुकीपासून, स्कॅमपासून वाचू शकता.

काही वेबसाईट्स ऑक्सिजन कंसंट्रेटरची भारतात विक्री करत आहेत. यात 1mg, Nightingales India, Healthklin आणि Healthgenie सारख्या वेबसाईट्स सामिल आहेत. या वेबसाईट्स सेफ असून याद्वारे खरेदी केली जाऊ शकते. परंतु मागणी वाढल्याने आणि पुरवठा घटल्याने येथे ऑक्सिजन कंसंट्रेटर आउट ऑफ स्टॉकही दाखवू शकतो.

(वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

मागणी आणि पुरवठ्याच्या अंतरातील फरकामुळे अनेक फ्रॉडस्टर्स हे ब्लॅकमध्येही विकत आहेत. काही फसवणूक करणारे ऑक्सिजन कंसंट्रेटरच्या जागी, दुसऱ्याच मशिनची विक्री करतात. यात अधिकतर ऑक्सिजन कंसंट्रेटरऐवजी humidifiers ची विक्री केली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मशिन घेण्यापूर्वी एखाद्या मेडिकल जाणकाराकडून ऑक्सिजन कंसंट्रेटर बाबत माहिती घ्या.

(वाचा - कोरोना लस घेतली म्हणजे झालं नाही; लसीकरणानंतर न विसरता करा एक काम)

जर, अतिशय अर्जंट ऑक्सिजन कंसंट्रेटरची गरज असेल, तर हे मशिन इम्पोर्टही करता येऊ शकतं. भारत सरकारने यावरील इम्पोर्ट टॅक्स हटवला आहे. त्यामुळे हे ग्लोबल वेबसाईट अ‍ॅमेझॉन किंवा विदेशात राहणाऱ्या व्यक्तीकडूनही मागवू शकता. जी किंमत भारतात द्यावी लागेल, जवळपास तेवढीच किंमत इम्पोर्टद्वारे द्यावी लागेल.

(वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

आता अनेक लोक ऑक्सिजन कंसंट्रेटरची विक्री करत आहेत. एखाद्याने व्हॉट्सअ‍ॅप किंवा सोशल मीडियावर ऑक्सिजन कंसंट्रेटरची विक्री करण्याबाबत सांगितलं, तर शक्यतो अशाप्रकारे ते विकत घेऊ नका. हे मशिन एखाद्या मेडिकल इक्विपमेंट डिलर किंवा अधिकृत चांगल्या ब्राँडच्या डिलरकडूनच घ्या. एखाद्याने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करताना अ‍ॅडव्हान्स रक्कम मागितली, तर असे पैसे देऊ नका. आधी ऑक्सिजन सिलेंडर तपासून मगच पेमेंट करा.

अनेक फ्रॉडस्टर्स या वस्तूची विक्री करताना व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात आणि पेटीएमसारख्या पेमेंट अ‍ॅपवरुन पैसे भरायला सांगतात. पैसे मिळाल्यानंतर, त्या व्यक्तीला ब्लॉक केलं जातं. असे अनेक प्रकार समोर आले असून ऑक्सिजन कंसंट्रेटर खरेदी करताना, योग्यरित्या तपासूनच घ्या.

First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply