जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कोरोना लस घेतली म्हणजे झालं नाही; लसीकरणानंतर न विसरता करा एक काम

कोरोना लस घेतली म्हणजे झालं नाही; लसीकरणानंतर न विसरता करा एक काम

कोरोना लस घेतली म्हणजे झालं नाही; लसीकरणानंतर न विसरता करा एक काम

कोविड-19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट कोविन पोर्टल (CoWin Portal) आणि आरोग्य सेतु अ‍ॅपवरुन (Aarogya Setu App) डाउनलोड करता येऊ शकतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 मे : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Coronavirus) परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशात 1 मेपासून 18 वर्षावरील नागरिकांचं वॅक्सिनेशन (Vaccination) सुरू करण्यात आलं आहे. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकचे कोविशिल्ड (Covishield) आणि कोवॅक्सिन (Covaxin) या दोन लशींचा वापर केला जात आहे. लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर, सरकार एक वॅक्सिनेशन सर्टिफिकेट देते, ज्यात सर्व डिटेल्स नाव, वय, जेंडर, वॅक्सिनेशनची सर्व माहिती असते. कोविड-19 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट कोविन पोर्टल (CoWin Portal) आणि आरोग्य सेतु अ‍ॅपवरुन (Aarogya Setu App) डाउनलोड करता येऊ शकतं. CoWin वरुन वॅक्सिनेशन सर्टिफिकेट कसं डाउनलोड कराल? - CoWin च्या अधिकृत वेबसाईटवर जा. - साइन इन / रजिस्टर बटणावर क्लिक करा.

(वाचा -  आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर )

- रजिस्टर्ड मोबाईल नंबरचा वापर करुन, साइन इन करा आणि त्यानंतर वन टाईम पासवर्ड (OTP) टाका. - लॉग इन केल्यानंतर तुमच्या नावाच्या खाली एक सर्टिफिकेट टॅब येईल. - वॅक्सिनेशन सर्टिफिकेटची सॉफ्ट कॉपी मिळवण्यासाठी डाउनलोडवर क्लिक करा.

(वाचा -  अलर्ट! Review पाहून Online Shopping करताय; मग आधी हे वाचाच )

Aarogya Setu वरुन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी - - फोनवर आरोग्य सेतु अ‍ॅप ओपन करुन मोबाईल नंबरचा वापर करुन साइन इन करा. - सर्वात वर असलेल्या CoWin टॅबवर क्लिक करा. - वॅक्सिनेशन सर्टिफिकेट पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर 13 अंकी बेनिफिशियरी रेफरेन्स आयडी इंटर करा. - त्यानंतर वॅक्सिनेशन सर्टिफिकेटसाठी, डाउनलोडवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात