जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / वीकेंड धमाल; आता फ्रीमध्ये पाहता येणार Netflix

वीकेंड धमाल; आता फ्रीमध्ये पाहता येणार Netflix

वीकेंड धमाल; आता फ्रीमध्ये पाहता येणार Netflix

यापूर्वी नेटफ्लिक्सकडून एक महिन्याची ट्रायल ऑफर देण्यात येत होती, परंतु आता कंपनीने ही ट्रायल ऑफर रद्द केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : जर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सचं (Netflix) सब्सक्रिप्शन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जर नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नसेल, तर कंपनी फ्रीमध्ये सब्सक्रिप्शन देत आहे. नेटफ्लिक्सने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. ज्याद्वारे युजर्स वीकेंडला फ्री स्ट्रिमिंगचा फायदा घेऊ शकणार आहेत. कंपनी ही ऑफर स्ट्रिमफेस्ट (StreamFest) अंतर्गत सादर करणार आहे. ही ऑफर केवळ दोन दिवसांसाठी आहे.

(वाचा -  Mirzapur पाहण्यासाठी उत्सुक आहात? या सोप्या स्टेप्सने व्हा Amazon Prime मेंबर )

4 डिसेंबरपासून ऑफर सुरू इंडिया टुडेने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने ही ऑफर सध्या केवळ भारतीय ग्राहकांना देणार असल्याचं सांगितलं आहे. याची सुरुवात 4 डिसेंबरपासून होणार आहे. या प्रोमोशनल ऑफरला स्ट्रिमफेस्ट असं म्हटलं जातंय. यापूर्वी नेटफ्लिक्सकडून एक महिन्याची ट्रायल ऑफर देण्यात येत होती, परंतु आता कंपनीने ही ट्रायल ऑफर रद्द केली आहे. (वाचा -  Reliance Jioची आणखी एक कमाल; स्वदेशी JioPages वेब ब्राउजर लाँच ) रिपोर्टनुसार, अधिकाधिक लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी कंपनीने या ऑफरची घोषणा केली आहे. ज्या नेटकऱ्यांकडे नेटफ्लिक्स नाही ते, फ्रीमध्ये दोन दिवस नेटफ्लिक्सवर सीरीज पाहू शकतात. ही ऑफर केवळ वीकेंडला उपलब्ध आहे. यावेळी कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा पेमेंट डिटेल्स द्यावे लागणार नाही.

(वाचा -  Whatsapp chat कसं लीक होतं? जाणून घ्या कसं कराल कायमस्वरुपी डिलिट )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात