नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : रिलायन्स जीओने (Reliance Jio) भारतात आपलं विकसित मोबाईल ब्राउजर ‘जीओ पेजेस’ (JioPages) लाँच केलं आहे. हे 8 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांची गोपनियता लक्षात घेऊन हे ऍप बनवण्यात आलं असून, यामुळे ग्राहकांना चांगल्या ब्राउजिंगचा अनुभव मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. जीओच्या प्रवक्त्यांनी, कंपनीने हे नवं वेब ब्राउजर लाँच केल्याचं सांगितलं आहे. ‘जीओ पेजेस’ हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांमध्ये काम करेल. मंगळवारपासून अपडेटेड JioPages गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध करण्यात आलं आहे. (वाचा - जिओ-क्वालकॉमने केली 5G नेटवर्कची यशस्वी चाचणी, भारतात लवकरच होणार लाँच ) JioPages क्रोमियम ब्लिंक इंजिनवर विकसित करण्यात आलं आहे. हे वेगवान इंजिन मायग्रेशनद्वारे, ग्राहकांना ब्राउजिंगचा चांगला अनुभव देईल. या स्वदेशी ब्राउजरवर, वेब पेजही जलद गतीने लोड केले जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
(वाचा - Reliance Jio 5000 हूनही कमी किंमतीत लाँच करणार 5G स्मार्टफोन )
अद्याप या वेब ब्राउजरबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी कंपनीच्या आधीच्या ब्राउजरलाही गुगल प्ले स्टोरवर 1.4 कोटीहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं होतं.