मुंबई, 20 ऑक्टोबर : WhatsApp वर कोणतंही चॅट डिलीट केल्यानंतर, त्याचा कोणताही रेकॉर्ड राहत नाही, असा अनेकांना समज होता. परंतु नुकतंच अनेक बड्या कलाकारांचं WhatsApp chat लीक झालं आणि ड्रग्सबाबत अनेक खळबळजनक खुलासे झाले. त्यामुळे आता या प्रकारानंतर अनेकांचा चॅट रेकॉर्ड राहत नसल्याचा समज तुटला आहे. बॉलिवूडमधून अनेकांचे चॅट बाहेर आल्यानंतर व्हॉट्सअपवरही, त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं.
WhatsApp वर दोन लोकांमध्ये झालेलं चॅट तिसरा व्यक्ती वाचू शकत नाही. पण फोनमधून डिलीट केलेलं चॅट रिकव्हर केलं जाऊ शकतं. जाणून घ्या व्हॉट्सअपवर चॅट कायमस्वरुपी कसं डिलीट कराल किंवा फोनमधून चॅट डिलीट केल्यानंतर ते कसं सेफ ठेवाल...
WhatsApp chat ऑथेंटिकेशन -
WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी एक ऑथेंटिकेशन सुविधा दिली आहे. ज्याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कोड बोलतात. ऑथेंटिकेशन कोडच्या मदतीने युजर आपल्या WhatsApp मध्ये 6 डिजिटचा कोणताही कोड टाकू शकतात. या कोडमुळे कोणताही हॅकर युजरच्या व्हॉट्सअपला क्लोन करू शकत नाही. जर हॅकरने व्हॉट्सअप क्लोन करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला ऑथेंटिकेशन कोडची गरज लागेल आणि त्या कोडशिवाय तो WhatsApp ओपन करू शकत नाही.
WhatsApp chat बॅकअप -
अनेकदा व्हॉट्सअपमध्ये युजरला आपल्या चॅटचा बॅकअप घेण्यासाठी पर्याय दिलेला असतो. अनेक युजर्स आपल्या व्हॉट्सअप चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्ह, आय क्लाउड किंवा ईमेलवर घेतात. या फीचरमुळेही व्हॉट्सअप चॅट लीक होऊ शकतं. WhatsApp chat backup घेतल्याने एंड टू एंड एनक्रिप्शन end to end encryption संपुष्टात येतं. म्हणजे, आधी जे चॅट केवळ दोन लोकांमध्ये होतं, ते आता दुसऱ्या सिस्टममध्येही आहे. आणि त्यामुळेच ते सेफ नाही.
जर युजरला चॅट फोनमधून डिलिट केल्यानंतर इतर ठिकाणांहूनही डिलिट करायचं असल्याचं, जिथे चॅट गुगल ड्राईव्ह, आय क्लाउडवर सेव्ह झालं आहे, तिथूनही डिलिट करा.
ई-मेलवर WhatsApp कनेक्ट -
युजर व्हॉट्सअपला ई-मेल आयडीशीही कनेक्ट करू शकतो. ई-मेल आयडीच्या मदतीने पुन्हा व्हॉट्सअप चॅट रिस्टोर करता येईल. पण हॅकरकडे तुमचा ई-मेल आयडी नसल्याने कोणीही डिलिटेड WhatsApp chat रिस्टोर करू शकत नाही. पण हॅकर किंवा कोणाकडेही तुमचा ई-मेल आयडी असल्यास हॅकिंगची शक्यता असते.
मेमरी कार्ड व्हॉट्सअप चॅट -
युजरला WhatsApp चॅट डिलिट करायचं आहे, पण चॅटमधील फोटो, इतर माहिती सेव्ह करायची असल्यास, युजर व्हिडिओ, फोटो पेन ड्राईव्ह, मायक्रो एसडी कार्ड, मेमरी कार्डमध्ये ट्रान्सफर करू शकतात.
अँड्रॉईड टू आयओएस चॅट -
जर युजर अँड्रॉईड फोन वापरत असेल, आणि आयफोनवर स्विच करत असेल, तर युजरचं WhatsApp chat आयफोनवर ट्रान्सफर होणार नाही. त्याचप्रमाणे आयफोन टू अँड्रॉईडमध्येही WhatsApp chat ट्रान्सफर होऊ शकत नाही.