नवी दिल्ली, 12 जानेवारी : ओप्पो (Oppo) ही चायनीज स्मार्टफोन कंपनी येत्या 18 जानेवारीला भारतीय बाजारपेठेत 'रेनो 5 प्रो 5 जी' (Oppo Reno 5 Pro 5G) हे मॉडेल सादर करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये फाइव्ह जी (5 G) तंत्रज्ञानाची कनेक्टिव्हिटी उपलब्ध असेल, तसंच मीडियाटेक डायमेन्सिटी 1000 प्लस (MediaTek Dimensity 1000) हा नवा मोबाइल प्रोसेसर त्यात असेल.
हे मॉडेल गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालं आहे. त्यासोबत रेनो फाइव्ह 5 जी (Reno 5G) आणि रेनो प्रो प्लस 5 जी (Reno Pro 5G) ही दोन मॉडेल्सही चीनच्या बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आली आहेत. भारतात मात्र केवळ 'रेनो 5 प्रो 5 जी' (Reno 5 Pro 5G) हेच मॉडेल सादर होण्याबाबत सांगण्यात आले असून, अन्य दोन मॉडेल्स कधी सादर होणार, याची माहिती दिलेली नाही.
Ready to experience the next best thing of the 5G world?
Get your hands on the fabulous and truly limitless #OPPOReno5Pro with 5G connectivity, futuristic videography capabilities and other infinite features. #LiveTheInfinite
टीझरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'रेनो 5 प्रो 5 जी' या भारतीय मॉडेलची किंमत चिनी मॉडेलइतकीच असेल. चीनमध्ये डिसेंबर महिन्यात दाखल झालेल्या 'ओप्पो रेनो 5 प्रो 5 जी' या स्मार्टफोन मॉडेलची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे.
'ओप्पो रेनो 5 प्रो 5 जी' या स्मार्टफोनला क्वाड कॅमेरा (Quad Camera) असून, तो रेक्टँग्युलर (आयताकृती) मोड्युलमध्ये बसवण्यात आला आहे. f/1.7 अॅपर्चरचा 64 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा, f/2.2 अॅपर्चरचा आठ मेगापिक्सेल क्षमतेचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, f/2.4 अॅपर्चरचा दोन मेगापिक्सेल क्षमतेचा मॅक्रो शूटर कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेल क्षमतेचा पोर्ट्रेट शूटर अशा चार कॅमेऱ्यांचा मागील कॅमेऱ्यांमध्ये समावेश आहे.
सेल्फीसाठी (Selfie) तब्बल 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा होल पंच कटआउटमध्ये स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात बसवण्यात आलेला आहे. त्याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ड्युएल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, ग्लोनॅस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फीचर्स आहेत. या स्मार्टफोनला 4350 मिलिअॅम्पिअर पर अवर क्षमतेची बॅटरी असून, 65 वॅट फास्ट चार्जिंगची क्षमता आहे.
या स्मार्टफोनची किंमत भारतात किती असेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे; मात्र चिनी मॉडेलच्या किमतीच्या आधारे त्याच्या भारतातल्या किमतीचा अंदाज बांधता येऊ शकतो. 'ओप्पो रेनो 5 प्रो 5 जी' या मॉडेलची 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज स्मार्टफोनची चीनमधील किंमत 3399 चायनीज युआन (38 हजार 200 रुपये) एवढी आहे. 12 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज क्षमता असलेल्या मॉडेलची किंमत 3799 चायनीज युआन (42 हजार 700 रुपये) एवढी आहे. ऑरोरा ब्लू, मूनलाइट नाइट, स्टारी नाइट अशा वेगवेगळ्या रंगांमधील मॉडेल्स उपलब्ध आहेत.