तुमचं Whatsapp चॅट आता फेसबुकसोबत शेअर होणार का? महत्त्वाची माहिती आली समोर

तुमचं Whatsapp चॅट आता फेसबुकसोबत शेअर होणार का?  महत्त्वाची माहिती आली समोर

Whatsapp च्या नव्या धोरणांमुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. युझर्सच्या खासगी आयुष्यात Whatsapp हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला जात असताना आता कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : Whatsapp च्या नव्या धोरणांमुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. युझर्सच्या खासगी आयुष्यात Whatsapp हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला जात असताना आता कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपला आपल्या नव्या धोरणाबाबत जगभरात बऱ्याच टीकेचा सामना करावा लागत आहे.नवीन धोरणाबद्दल लोकांच्या मनात असलेली शंका दूर करण्यासाठी कंपनीने बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच कंपनीने Whatsappचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जाणार नाही असं देखील सांगितलं आहे.

या व्यतिरिक्त, कंपनीने असेही म्हटले आहे की नवीन पॉलिसी अपडेटमुळे आपल्या गोपनीय आणि खासगी कोणत्याही प्रकारच्या माहितीवर याचा परिणाम होणार नाही. ती माहिती कुणालाही दिली जाणार नाही ती सुरक्षित राहिल असंही स्पष्टीकरण यावेळी कंपनीकडून देण्यात आलं आहे.

नवीन धोरणामध्ये व्हॉट्सअ‍ॅप व्यवसायाबाबतचे बदल असणार आहेत जे पर्यायी असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. तसेच आम्ही डेटा कसा संग्रहित आणि वापरतो हे अधिक स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपने डेटा, कॉल लॉग आणि डेटा सारख्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. युझर्सचा डेटा व्हॉट्सअ‍ॅप फेसबुकबरोबर शेअर करणार नाही असंही त्यामध्ये Whatsapp ने म्हटलं आहे.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप विरोधात व्यापारी संघटना, CAIT ने सरकारला पत्र लिहिलं होतं. कॅटने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत चिंता व्यक्त करत, ही नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखण्याचं किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पूर्णपणे बंदी आणण्याचं म्हटलं आहे.

काय आहे WhatsApp ची नवी पॉलिसी -

व्हॉट्सअ‍ॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यात व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सचा डेटा कसा प्रोसेस आणि तो फेसबुकशी कसा शेअर करणार हे सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप सुरू ठेवण्यासाठी युजर्सला नवी पॉलिसी (New Terms and Policy) मान्य करावी लागेल.

दरम्यान, WhatsApp च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या अपडेटमुळे युजर्सची प्रायव्हसी संपुष्ठात येणार नाही. कंपनी आजही युजर्सच्या प्रायव्हसीबाबत वचनबद्ध आहे. नव्या अपडेटमुळे फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या डेटा शेअरिंगबाबत कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही युजरचं प्रायव्हेट चॅट पब्लिक होणार नाही. ज्याने युजर्सचा बिझनेस वाढेल, केवळ तिचं माहिती फेसबुकवर (Facebook) दिली जाईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 12, 2021, 11:54 AM IST

ताज्या बातम्या