नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : Oppo F17 Pro स्मार्टफोनवर सध्या चांगल्या डिल्स आहेत. Flipkart वर सुरू असलेल्या Oppo च्या Flipkart Oppo Fantastic Days 2021 Sale मध्ये हा फोन 8000 रुपयांत डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे. आठ हजारांच्या या बंपर डिस्काउंटनंतर फोनची किंमत 25,990 रुपयांवरुन कमी होऊन 17,990 रुपये झाली आहे.
त्याशिवाय Oppo F17 Pro खरेदी करताना तुम्ही कोटक बँक क्रेडिट किंवा क्रेडिट EMI चा वापर केल्यास, तुम्हाला 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटही मिळेल. यात अधिकतर सूट 1250 रुपये आहे. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड सूट दिली गेली आहे.
Oppo F17 Pro स्पेसिफिकेशन्स -
फोनला 1080×2400 पिक्सल रेजोल्यूशसह 6.43 इंची फुल एचडी+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. Oppo F17 Pro फोनला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे. फोनला मीडियाटेक हीलियो P95 SoC चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोनला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. 4015mAh बॅटरी सह 30 W VOOC Flash Charge 4.0 फ्लॅश चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, wifi, ब्लूटूथ 5.1, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक, एक USB टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.
कॅमेरा -
फोटोग्राफीसाठी फोनला LED फ्लॅशसह चार रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर आणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी कंपनीने फोनमध्ये 16 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Oppo, Oppo smartphone