मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Oppo चा A56 5G स्मार्टफोन लाँच; पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Oppo चा A56 5G स्मार्टफोन लाँच; पाहा काय आहेत फीचर्स आणि किंमत

 चीनी कंपनी ओप्पोने Oppo A56 5G हा नवीन स्मार्टफोन (OPPO will launch Oppo A56 5G ) लॉन्च केला आहे. यात चांगला बॅटरी बॅकअप आणि मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : फेस्टिव्ह सिजनमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या नवनवीन प्रॉडक्ट्स लॉन्च करत आहेत. आता चीनी कंपनी ओप्पोने Oppo A56 5G हा नवीन स्मार्टफोन (OPPO will launch Oppo A56 5G ) लॉन्च केला आहे. यात चांगला बॅटरी बॅकअप आणि मीडियाटेक डायमेंसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा (Oppo A56 5G features) सेटअप आहे. Oppo A56 5G लवकरच विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असणार आहे.

Bank Money : चुकून दुसऱ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे गेले तर...; असे मिळवा परत!

Oppo A56 5G या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंची एलसीडी स्क्रीन देण्यात आली असून 6GB रॅम आणि  128GB इंटर्नल स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलं आहे. गरज पडल्यास यात मेमरी कार्डही लावता येणार आहे. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh चा बॅटरी बॅकअप देण्यात आला असून त्यासाठी 10W चा फास्टेस्ट चार्जरही देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 1,599 युआन म्हणजेच 18,783 रुपये इतकी ठेवली आहे.

1 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp;यात तुमचा फोन तर नाही ना?

दरम्यान, दिवाळीत देशातली टेलिकॉम सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी असलेल्या Reliance Jio ने 'मेकिंग ऑफ जिओफोन नेक्स्ट' (Making of Jiophone Next) ही फिल्म रिलीज केली आहे. हा मेड इन इंडिया स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी पडद्यामागे काय काय घडलं, याचं थोडक्यात दर्शन या छोट्या व्हिडीओतून घडवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये Jio ने Android वर आधारित असलेल्या आपल्या प्रगती ऑपरेटिंग सिस्टीमवर प्रकाश टाकला आहे. प्रत्येक भारतीयाला तंत्रज्ञानाची समान संधी आणि समान उपलब्धता करून देण्यासाठी जिओफोन नेक्स्ट कटिबद्ध आहे, असं सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Mobile, Mobile Phone, Oppo smartphone