मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Oppo चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; किंमत 15 हजारहूनही कमी

Oppo चा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; किंमत 15 हजारहूनही कमी

ओप्पोने (Oppo) आपल्या A सीरीजचा नवा स्मार्टफोन A53s (Oppo A53s) लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन 5G आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा फोन 15000 रुपयांहूनही कमी बजेट रेंजमध्ये आहे.

नवी दिल्ली, 27 एप्रिल : स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने (Oppo) आपल्या A सीरीजचा नवा स्मार्टफोन A53s (Oppo A53s) लाँच केला आहे. कंपनीचा हा फोन 5G आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा फोन 15000 रुपयांहूनही कमी बजेट रेंजमध्ये आहे. कंपनीने हा फोन दोन वेरिएंटमध्ये लाँच केला आहे. 6GB+128GB आणि 8GB+128GB स्टोरेज.

फोनच्या 6GB+128GB मॉडेलची किंमत 14,990 रुपये आहे आणि 8GB+128GB मॉडेलची किंमत 16,990 रुपये इतकी आहे. फोनचे दोन्ही वेरिएंट्स फ्लिपकार्टवर 2 मे दुपारी 12 वाजल्यापासून सेलसाठी उपलब्ध होणार आहेत.

Oppo A53s 5G फोन फीचर्स -

- 6.5 इंची एचडी+ डिस्प्ले

- अँड्रॉईड 11 बेस्ड

- ColorOS 11.1

- स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे.

- ग्राफिक्ससाठी जी57 MC2 जीपीयू

- फिंगरप्रिंट सेंसर

(वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

- 5,000mAh बॅटरी

- 5जी कनेक्टिविटी सपोर्ट

- ब्लूटूथ वर्जन 5.1

- यूएसबी टाइप-सी पोर्ट

- 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक

(वाचा - तुमच्या जवळपास Aadhaar सेवा केंद्र कुठे आहे? फोनच्या मदतीनं अगदी सहज शोधा सेंटर)

कॅमेरा -

Oppo A53s 5G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलला तीन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. रियर प्रायमरी कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा दोन्हीही 30fps फुल एचडी व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात.

First published:
top videos

    Tags: Oppo, Oppo smartphone